वाई / प्रतिनिधी
मौजे वेळे- भिलारवाडी, ता. वाई गावाच्या हद्दीत फिरती तपासणी करीत टेम्पो मधुन रायवळ प्रजातींचा लाकुडमाल १०.६५ घ.मी विनापरवाना वक्षतोड करून वाहतुक करीत असताना पकडण्यात आला आहे. या कारवाईत वाहन क्रमांक एम.एच.०४ एफ पी ५९७१ जप्त करण्यात आले असून आरोपी मधूकर बाजीराव जाधव रा. कडेठाण ता. दौंड याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर अवैध वृक्षतोड व वाहतुक केल्याप्रकरणी महाराष्ट्र वृक्षतोड कायद्यानुसार गुन्हा दाखला करण्यात आला आहे. सदर कारवाईत सुमारे 3 लाख 54 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास चालु आहे. सदरची कारवाई मा.उपवनसंरक्षक सातारा उत्तम सावंत, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले, यांचे मार्गदर्शनाखाली वाई वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी ही कारवाई पार पाडली.