Tarun Bharat

बीडशेड येथील अतिक्रमणावार सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई

दै. तरुण भारताच्या बातमीनंतर कारवाई

कसबा बीड/प्रतिनिधी

बीड शेड तालुका करवीर येथील कुंभी कासारी सहकारी साखर कारखाना यांच्या गट ऑफिस समोरील अतिक्रमण केलेल्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमण काढण्यासाठी नोटिसा दिल्या होत्या. हे वृत्त दैनिक तरुण भारत च्या माध्यमातून प्रसिद्ध करण्यात आले होते. आज सकाळी 11 वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सी. एन. भोसले पाटील, सुपरवायझर जयसिंगराव देसाई तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाची सर्व टीम यांनी मिळून कुंभी कासारी साखर कारखान्याच्या गट ऑफिस समोरील अतिक्रमण जेसीबीच्या साह्याने हटविले. त्यामुळे या गट ऑफिस समोरील जागेने मोकळा श्वास घेतला आहे.

कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे बीड शेड येथील गट ऑफिसच्या समोरील जागेत व समोर खाद्यपदार्थाच्या गाड्या लावून अतिक्रमण केलेले होते. या व्यावसायिकांच्याकडून सदर जागेत फरशी, सिमेंटचे पत्रे टाकून कायमस्वरूपी बांधकाम तयार केलेले होते, खाद्यपदार्थाच्या गाड्यांमुळे खवय्यांच्या कडून रस्त्यावरतीच गाडी पार्किंग केली जात होती. त्यामुळे रस्त्यावरती गर्दी होत होती. ऑक्टोबर महिन्यात कुंभी कासारी साखर कारखान्याचा 2022 गळीत हंगाम सुरू होत असल्याने सभासद वर्ग तसेच वाहनधारकांना या अतिक्रमण केलेल्या खाद्यपदार्थाच्या गाड्यांमुळे नाहक त्रास सोसावा लागणार होता. पण आज अतिक्रमण काढल्यामुळे या ठिकाणी कुंभी कासारी साखर कारखाना सभासद वर्ग व वाहने यांना वाहतुकीसाठी त्रास होणार नाही.

सार्वजनिक बांधकाम विभाग बालिंगा ते घानवडे रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी लेखी पत्र दिले होते. 30 सप्टेंबर पर्यंत अतिक्रमण हटवावे अन्यथा धडक कारवाई मोहीम राबवण्यात येईल असे सांगण्यात आले. ज्या लोकांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी अतिक्रमण काढावे यासाठी वेळ देण्यात आला होता. पण अतिक्रमण न काढल्यामुळे आज पर्यायाने ही मोहीम राबवावी लागली. बालिंगा ते आरळे घानवडे या रोडवर ज्या ज्या लोकांनी अतिक्रमण केले आहे हे अतिक्रमण काढण्यात येईल,असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सी एन भोसले यांनी सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व त्यांची सर्व टीम, कुंभी कासारी साखर कारखान्याचे गट ऑफिस विभागातील अधिकारी, सिक्युरिटी विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

KDC ELECTION : ए.वाय.पाटील यांच्या विरोधात विश्वनाथ पाटील लढणार

Archana Banage

कोल्हापूर : मायक्रोफायनान्सच्या फेऱ्यामध्ये महिला का अडकत आहेत? त्यावर उपाययोजनेसाठी अभ्यासगट नियुक्त करणार : मंत्री मुश्रीफ

Archana Banage

साजणीत सरपंच व उपसरपंच अपात्र,परिसरात खळबळ,जिल्ह्यातील पहिलीच घटना

Archana Banage

भाजपा कार्यकर्त्यांनी साताऱ्यात केला मंत्री नवाब मलिक यांचा निषेध

Abhijeet Khandekar

राहुल गांधी यांच्या अटकेचे सांगलीत पडसाद

Archana Banage

श्रीरामाच्या नावाने देशात आतंकवाद- तुषार गांधी

Abhijeet Khandekar