Tarun Bharat

साखर कारखान्यांनी खासगी काट्यावर वजन केलेला ऊस नाकारल्यास कारवाई

पुणे / प्रतिनिधी : 

Action if sugar factories reject sugarcane weighed on private forks खासगी वजन काटे व साखर कारखान्यांचे वजन काटे हे दोन्ही ही वैधमापन शास्त्र या विभागाकडून प्रमाणित केलेले असल्यामुळे त्यावरील वजने ग्राह्य धरणे अपेक्षित आहे. खासगी काट्यावर वजन केले म्हणून ऊस नाकारणे किंवा शेतकऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न झाल्यास अनुचित व्यवसाय ठरवून कारवाई करण्याचा इशारा साखर आयुक्तालयाने राज्यातील साखर कारखानदारांना दिला आहे.    

याबाबत राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी एक परिपत्रक जारी केले असून, त्यानुसार  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात उसाच्या वजनाबाबत कोणत्याही शंका उद्भवू नये म्हणून साखर कारखान्यांच्या काही कृतींना अनुचित प्रथा ठरवले आहे. त्यानुसार आता कारखान्यांना खाजगी वजन काट्यावर वजन केल्यास शेतकऱ्यांचा ऊस नाकारता येणार नाही. असे शेतकरी, वाहनचालक, मुकादम यांच्याविरुद्ध कारवाई करता येणार नाही. उसाच्या गाड्यांचा जाणीवपूर्वक क्रम डावलता येणार नाही. शेतकऱ्यांना धमकावणे, शेतकऱ्यांच्या उसाची पुढच्या वर्षी नोंदणी न करणे, शेतकऱ्यांचे जाणीवपूर्वक सभासदत्व रद्द करण्याचा प्रयत्न करणे, अशी अडवणूक करता येणार नाही.  खासगी वजनकाट्यावर केलेले उसाचे वजन व साखर कारखान्याकडील वजन काट्यावर केलेले त्याच उसाचे वजन यामध्ये तफावत आल्यास त्याची तक्रार संबंधित प्रादेशिक सहसंचालक (साखर) व ज्या त्या जिल्ह्यातील वजनमापन अधिकारी यांच्याकडे करावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

अधिक वाचा, Kolhapur : वाजत गाजत आणलेली 21 लाखाची दुचाकी जळून खाक

काट्यांवर थेट प्रिंट बंधनकारक

साखर कारखान्यांचे वजन काटे अद्ययावत ठेवावेत,  लोडसेल ते जंक्शन बॉक्स व जंक्शन बॉक्स ते इंडिकेटरपर्यंतच्या सर्व केबल्स अखंड व कुठेही कापलेल्या अथवा त्यावरील आवरण काढलेल्या नसाव्यात तसेच त्यावर चिकट टेपही लावलेल्या नसाव्यात, छुपे उपकरण बसवू नये, आयटी कीट प्रमाणित  काट्यासच संगणक प्रणाली उपलब्ध असावी. वे इंडीकेटरलाच प्रिंटीग सुविधा व  त्या पावतीवर वाहन क्रमांक नोंद करून सही शिक्क्यासह पावती देण्यात यावी, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.

Related Stories

पुणे विभागातील 9 लाख 93 हजार 630 जण कोरोनामुक्त!

Tousif Mujawar

प्रभाग रचनेवरुन राज ठाकरेंचा हल्लाबोल, आता लोकांनीच कोर्टात जाण्याचं केलं आवाहन

Archana Banage

बीपीसीएलच्या खासगीकरणातून सरकारला मिळणार 45 हजार कोटी?

Omkar B

वॉटर एटीएम घोटाळा, ग्रा.पं.निधीवरून सभा गाजली

Archana Banage

पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा

datta jadhav

मायणीत सराफ दुकानावर चोरटय़ांचा डल्ला

Patil_p