जिल्हाधिकारी नितेश पाटील यांची बैठकीत सूचना : इस्पितळांनी रुग्णांकडून उपचारासाठी जादा शुल्क आकारल्यास कारवाई होणार
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील कोणत्याही इस्पितळांनी रुग्णांकडून उपचारासाठी अतिरिक्त शुल्क आकारल्यास व आयुषमान भारत आरोग्य कर्नाटक योजनेंतर्गत रुग्णांच्या नोंदी न केल्यास संबंधितांवर केपीएमई कायद्यांतर्गत कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांना केली
आहे.
शुक्रवारी जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली आयुषमान भारत आरोग्य कर्नाटक कार्यक्रमासंबंधी झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही सूचना केली. या बैठकीत अनेक तक्रारींची दखल घेत त्यांचे निवारण करण्यात आले. आरोग्य विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.
कोरोनाच्या काळात व इतर आजारांवर सरकारी योजनेंतर्गत उपचार करताना अतिरिक्त शुल्क आकारण्यासंबंधी सुवर्ण आरोग्य ट्रस्ट साहाय्यवाणी केंद्राला जिल्हय़ातील 11 इस्पितळांसंबंधी 18 तक्रारी आल्या आहेत. यासंबंधी लाभार्थी व इस्पितळांच्या प्रमुखांशी बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीत वैद्यकीय कचरा, राष्ट्रीय कुष्टरोग निर्मूलन कार्यक्रमांविषयीही चर्चा झाली. रोटरी रक्तभंडार निपाणी, रोटरी रक्तभंडार गोकाक व केएलई संस्थेच्या रक्तभंडारांना प्रमाणपत्र देऊन त्यांना अनुमती देण्यात आली. जिल्हय़ातील सर्व तालुक्मयांत रक्तभंडार सुरू करण्यासंबंधी बैठकीत सूचना करण्यात आल्या.
अतिरिक्त रकमेचा धनादेश परत करण्याचा आदेश
इस्पितळांनी वसूल केलेले अतिरक्त 7 लाख 10 हजार रुपये संबंधितांना परत करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱयांनी केला. हृदय शस्त्रक्रियेसंबंधी इस्पितळांनी घेतलेले 2 लाख 70 हजार 192 अतिरिक्त रकमेचा धनादेश परत करण्याची सूचनाही जिल्हाधिकाऱयांनी केली असून हा धनादेश संबंधितांना देण्यात आला.