२३ हजार ७५० रुपयाची रोकड, चार मोबाईल, एक दुचाकी असा सुमारे १ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त : पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या विशेष पथकाची कारवाई
इचलकरंजी/प्रतिनिधी
शहरातील रजिस्टर ऑफिस शेजारी असणाऱ्या एका बंगल्यात अवैधपणे सुरु असलेल्या ऑनलाईन मटका अड्ड्यावर शनिवारी सांयकाळी पोलिसांनी छापा टाकला. या छाप्यात मटका बुकी मालकासह दोघांना अटक केली.
बुक्की मालक राकेश शरद गायकवाड, त्यांचा साथिदार तुषार रघूनाथ जांभळे ( दोघे रा. धनगर गल्ली, हातकणंगले) अशी त्याची नावे आहेत. त्याच्याकडून पोलिसांनी २३ हजार ७५० रुपयाची रोकड, चार मोबाईल, एक दुचाकी असा सुमारे १ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या विशेष पथकाने केलीअसून, यांची नोंद गावभाग पोलिसात झाली आहे.
पोलिसाच्याकडून समजलेली माहिती अशी, शहरातील रजिस्टर ऑफिस शेजारी असणाऱ्या जिनगोंडा पाटील यांच्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये गेल्या काही दिवसापासून अवैधपणे ऑनलाईन मटका अड्डा सुरु करण्यात आला होती. यांची माहिती पोलीस उपाअधीक्षक बाबूराव महामुनी यांच्या विशेष पथकाला बातमीदाराकडून समजली. या ऑनलाईन मटका अड्ड्यावर शनिवारी सांयकाळी छापा टाकला. यावेळी पोलिसांना बुकी मालक राकेश गायकवाड, त्यांचा साथिदार तुषार जांभळे ( दोघे रा. धनगर गल्ली, हातकणंगले) हे मोबाईलवरुन मटका घेत असल्याचे मिळून आल्याने या दोघा अटक केली. त्याच्याकडून २३ हजार ७५० रुपयाची रोकड, चार मोबाईल, एक दुचाकी, मटक्याचे साहित्य असा सुमारे १ लाख २५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत कॉन्स्टेबल सुनील पाटील, पोलीस कॉन्स्टेबल सागर हरगुले, पोलीस कॉन्स्टेबल महाजन आदींचा सहभाग होता.