प्रतिनिधी/ सातारा
स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत सातारा नगरपालिकेमार्फत खणआळी परिसरातील दुकानदारांवर प्लास्टिक वापराबाबत दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. अंदाजे 45 दुकानांची तपासणी करण्यात आली. त्यामधील तीन दुकानामध्ये अंदाजे 35 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले व प्रत्येकी पाच हजार रुपये असा पंधरा हजार रुपयांचा दंड करण्यात आला. ही कारवाई आरोग्य विभाग प्रमुख प्रकाश राठोड, आरोग्य निरीक्षक प्रशांत गंजीवाले, मुकादम संदीप पाटसुते, तुकाराम खंडजोडे, लक्ष्मण कांबळे व इतर कर्मचाऱयांनी केली.