Tarun Bharat

मनपाकडून विनापरवाना जाहिरात फलक हटविण्याची कारवाई

Advertisements

प्रतिनिधी /बेळगाव

महापालिका व्याप्तीमध्ये असंख्य ठिकाणी विनापरवाना जाहिरात फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे विनापरवाना फलक हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. या आदेशानुसार बुधवारी अनधिकृत जाहिरात फलक हटविण्याची मोहीम अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या माध्यमातून राबविण्यात आली.

महापालिकेच्या जागेत आणि खासगी ठिकाणी लावण्यात आलेल्या जाहिरात फलकांसाठी महापालिकेने निविदा काढल्या आहेत. या निविदा मंजूर करण्यापूर्वीच शहरात ठिकठिकाणी जाहिरात फलक लावण्यात आले आहेत.

जाहिरात लावण्यासाठी महापालिकेकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र परवानगी न घेताच ठिकठिकाणी कटआऊट आणि जाहिरात फलक लावल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आले आहे. विनापरवाना जाहिरात फलक लावण्यात आल्याने महापालिकेचा महसूल बुडत आहे. त्यामुळे अनधिकृत फलक हटविण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे.

या आदेशानुसार शहरातील अनधिकृत होर्डिंग्स आणि कटआऊट हटविण्याची मोहीम बुधवारी सकाळी राबविण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या माध्यमातून ही कारवाई राबवून फलक जप्त करण्यात आले.

Related Stories

दसऱयामुळे बाजारात कोटींची उलाढाल

Patil_p

सत्तरीच्या दशकात बेळगावात खो-खोचा प्रसार

Amit Kulkarni

काँक्रिटीकरणामुळे शहराच्या पश्चिमेकडील प्रवेशद्वारे बंद

Patil_p

वडगाव येथे घराला आग

Patil_p

धामणे येथील तलाठी ऑफिस की गोडाऊन?

Amit Kulkarni

पासपोर्ट सेवा केंद्र केव्हा होणार सुरू?

Patil_p
error: Content is protected !!