Tarun Bharat

Kolhapur Jaggeri कर्नाटकी गुळाला कोल्हापूरचे लेबल लावल्यास कारवाई

जिल्हाधिकारी राहूल रेखावार; बाजार समिती अधिकारी, व्यापारी, गुळ उत्पादकांसोबत बैठक

कोल्हापूर प्रतिनिधी

कर्नाटकमधून कोल्हापूर बाजार समितीमध्ये येणाऱया गुळाला कोल्हापूरचे लेबल लावून गुळाची विक्री केल्यास कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिला. तसेच कर्नाटकमध्ये कोल्हापुरचे लेबल लावून गुळाचे पँकींग होत असले तर तेथील गुळ उत्पादकांवरही कर्नाटक प्रशासनाने कारवाई करावी याबाबत पत्रव्यवहार करणार असल्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांनी सांगितले.

हेही वाचा : Constitution Day; संविधान दिनानिमित्त उद्या कोल्हापुरात रॅली

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली बाजार समिती प्रशासन, गुळ उत्पादक शेतकरी, अडते, व्यापारी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी रेखावार यांनी कर्नाटकी गुळाची कोल्हापुरच्या नावाखाली विक्री केल्यास कारवाई करण्याचा आदेश बाजार समिती प्रशासनाला दिला.

गुळाला 3700 रुपये दर मिळाला पाहिजे, कर्नाटकमधून होणारी आवक बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी मंगळवारपासून जिल्हय़ातील गुळ उत्पादक शेतकऱयांनी बाजार समितीमधील गुळाचे सौदे बेमुदत बंद पाडले आहेत. दराबाबत गुरुवारीही तोडगा निघाला नसल्याने सौदे बंदच राहिले. यादरम्यान कोल्हापूर दौऱयावर असलेले पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेवून गुळ उत्पादकांनी त्यांच्या मागण्यांचे निवेदन दिले. यांनतर जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समिती प्रशासन, गुळ उत्पादक, अडते, व्यापारी यांची बैठक घेतली.

बैठकीमध्ये जिल्हाधिकारी रेखावार यांनी कर्नाटकमधून येणाऱया गुळाला कोल्हापुरी गुळाचे लेबल लावले जात असेल तर हा प्रकार गंभीर आहे. अशा व्यापाऱयांवर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी बाजार समिती प्रशासनाला दिला. तसेच अशा पद्धतीने लेबल लावून गूळ विक्री करणाऱया व्यापाऱयांची माहितीही बाजार समिती प्रशासनाकडून मागविली आहे. तसेच सौदे सुरु करण्याची सूचना गुळ उत्पादकांना केली. बैठकीला बाजार समितीचे प्रशासक प्रकाश जगताप, सचिव जयवंत पाटील यांच्यासह गुळ उत्पादक शेतकरी, व्यापारी, अडते आदी उपस्थित होते.

Related Stories

अखेर बसस्थानकाचा ताबा कॅन्टोन्मेंटकडे

Amit Kulkarni

शहीद भगतसिंग जयंती निमित्त बेळगाव येथे भव्य बाईक रॅली

mithun mane

विनामास्क फिरणाऱयांकडून दंड वसुली सुरूच

Omkar B

रामनगर-खानापूर रस्त्याचा वनवास संपणार कधी

Patil_p

हुतात्मा दिन गांभीर्याने आचरणात आणा

Patil_p

जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना भेटण्यासाठी ठराविक वेळ

Patil_p