Tarun Bharat

मंत्र्यांच्या बैठकीत झोपणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई

Advertisements

दूरसंचार मंत्री वैष्णव यांच्या बैठकीतील प्रकार : अधिकाऱयाने गमावली नोकरी

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

दूरसंचार मंत्रालयाच्या बैठकीत विचित्र प्रकार घडला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या बैठकीत बीएसएनएलच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाला झोप अनावर झाली. हा प्रकार समजताच या अधिकाऱयाला बैठकीतून बाहेर काढण्यात आले आणि व्हीआयएस घेण्याचा निर्देश देण्यात आला. बीएसएनएलला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा सुरू असलेल्या बैठकीतच हा प्रकार घडला. केंद्र सरकारने बीएसएनलची स्थिती सुधारण्यासाठी 1.64 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे.

हा प्रकल्प दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांनी सीजीएम पातळीवर बैठक घेत चांगली कामगिरी करून बीएसएनएलमध्ये कायापालट घडवून आणा किंवा व्हीआरएस घ्या असे कर्मचाऱयांना बजावले होते. बैठकीत झोपी जाणारा अधिकारी बेंगळूर शहरात नियुक्त होता. त्याच्याकडे गुणवत्ता अन् निरीक्षणाची जबाबदारी होती.

काम करू शकत नसल्यास त्वरित नोकरी सोडून व्हीआरएस घ्या. व्हीआरएस न घेतल्यास सरकारकडे अनिवार्य सेवानिवृत्ती नियमाचा मार्ग मोकळा असल्याचे वैष्णव यांनी बीएसएनएलच्या कर्मचाऱयांना स्पष्ट शब्दांत सांगितले आहे.

Related Stories

पंजाब : कोरोनाबाधितांची संख्या 1,33,975 वर

Rohan_P

मान्सून 15 मे पर्यंत अंदमानात

datta jadhav

मध्यप्रदेश : कार आणि डंपरच्या अपघातात 7 जणांचा मृत्यू; 5 जखमी

Rohan_P

अलका लांबांशी असभ्य वर्तन, ‘आप’ च्या कार्यकर्त्यावर उगारला हात

prashant_c

युपी : केंद्रीय राज्यमंत्री संजीव बालियान यांच्या भावाचे कोरोनाने निधन

Rohan_P

जयपूर राजघराण्याचा ताजमहालवर दावा

Patil_p
error: Content is protected !!