Tarun Bharat

गृहमंत्र्यांच्या दौऱयापूर्वी काश्मीरमध्ये कारनामे

Advertisements

पुलवामात पोलीस हुतात्मा ः दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांवर हल्ला ः शोधमोहीम जारी

श्रीनगर / वृत्तसंस्था

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 4-5 ऑक्टोबरला जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर जाणार आहेत. ते 4 ऑक्टोबरला राजौरी आणि 5 ऑक्टोबरला बारामुल्ला येथे असतील. अमित शहा यांच्या दौऱयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये 5 दिवसांत 7 दहशतवादी मारले गेले आहेत. तसेच शनिवारी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक पोलीस हुतात्मा झाला. याचदरम्यान सीमारेषेवरही पाकिस्तानचे कारनामे वाढले असून ड्रोनच्या माध्यमातून घुसखोरी करण्याचे प्रकार उजेडात आले आहेत.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील पिंगलाना भागात सीआरपीएफ आणि पोलिसांच्या संयुक्त दलावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस हुतात्मा झाल्याचे वृत्त आहे. त्याचवेळी सीआरपीएफचा एक जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली होती. केंद्रीय गृहमंत्र्यांच्या दौऱयापूर्वीच ही घटना घडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क करण्यात आली आहे.

शोपियानमध्ये चकमक

जम्मू-काश्मीरमधील शोपियानमध्येही सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. येथील बास्कुचन इमामसाहेब परिसरात झालेल्या चकमकीत 2 दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या शोधासाठी सुरक्षा दलांनी परिसर रिकामा केला होता. दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 30 सप्टेंबर रोजी शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तेव्हापासून येथे लष्कराची विशेष शोधमोहीम सुरू होती.

Related Stories

रस्त्यांचे खड्डे भरतेय वृद्ध दाम्पत्य

Patil_p

एअर इंडिया एक्स्प्रेस विमानांना 2 ऑक्टोबरपर्यंत दुबईत नो एन्ट्री

Patil_p

दिल्ली : एम्स रुग्णालयात आग; जीवितहानी नाही

Tousif Mujawar

अफताबची नाटके सुरुच

Patil_p

देशात कोरोना चाचण्या 40 लाख पार

Patil_p

पेट्रोल-डिझेल दराचा देशात भडका सुरूच

Patil_p
error: Content is protected !!