10 रुपये आणलेल्या मुलीला दिला 90 रुपयांचा बर्गर : कर्मचाऱयाने दाखविले औदार्य वाखाणण्याजोगे
बर्गर निश्चितपणे मुलांच्या पसंतीच्या फास्ट फूडपैकी एक आहे. अलिकडेच उत्तरप्रदेशच्या नोएडा जिल्हय़ात एक लहान मुलगी एका आउटलेटमध्ये गेली आणि तिने कमी पैशांमध्ये बर्गर खाण्यासाठी मागितला. त्या मुलीकडे केवळ 10 रुपये होती, तर तिला जो बर्गर हवा होता, त्याची किंमत 90 रुपये होती. त्यानंतर जे घडले ते जाणून घेतल्यावर कुणीही भावुक होईल. मुलीची निरासगता आणि खाण्याची इच्छा पाहून तेथील कर्मचाऱयाने केलेली कृती लाखो लोकांची मनं जिंकून गेली.
सोशल मीडियावर यासंबंधी एक पोस्ट व्हायरल होत आहे. बर्गर विकत घेऊ पाहणाऱया मुलीची इच्छा पूर्ण करण्यासाठी तेथील एक कर्मचारी सरसावला. मुलीला बर्गरची पूर्ण रक्कम देता येणार नसल्याचे कळल्यावर या कर्मचाऱयाने स्वतःच्या खिश्यातून उर्वरित 80 रुपये जमा करत तिला बर्गर मिळवून दिला आहे. नोएडा येथील एका आउटलेटवर एका ग्राहकाने मुलीला 10 रुपयांच्या नोटेसह कॅमेऱयात कैद केले आणि हे छायाचित्र ट्विटर हँडलवर शेअर केल्यावर काही वेळातच ते व्हायरल झाले आहे.
ही घटना 13 सप्टेंबर रोजीची असली तरीही युजरने 16 ऑक्टोबर रोजी जागतिक खाद्यदिनी पोस्ट शेअर केली. 10 रुपये हातात होते, पण बर्गर खाण्यासाठी 90 रुपयांची गरज होती, परंतु काउंटरमागे बसलेल्या युवकाने नकार दिला नाही आणि उर्वरित 80 रुपये स्वतः जमा करून मुलीला त्याने बर्गर दिल्याचे युजरने सोशल मीडियावर छायाचित्र अपलोड करत म्हटले आहे. संबंधित आउटलेटच्या कंपनीने या कृतीची दखल घेत त्या कर्मचाऱयाचे कौतुक केले आहे.
जागतिक खाद्य दिन साजरा करण्यासाठी याहून अधिक चांगली पद्धत कुठली असू शकते? मुलीने बर्गर खाण्याचा आनंद मिळविला असेल अशी आम्हाला आशा आहे. तर आमचे कर्मचारी धीरज हे ‘काइंड किंग’ असल्याने आम्ही त्यांचे कौतुक करू इच्छितो. त्याच्या कृतीने आम्हाला सर्वांची सेवा करण्यासाठी अधिक प्रेरित केले असल्याचे कंपनीने म्हटले आहे.