Tarun Bharat

हेंडाची स्मार्ट ‘की’ असणारी ऍक्टीव्हा लाँच

6 रंगातील पर्यायासह खरेदी करता येणार ः किंमत 74 हजारपासून सुरु

मुंबई  

 होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया (एमएमएसआय) यांनी आपली नवीन स्मार्ट ऍक्टीव्हा भारतात सादर केली आहे. मुंबईमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये कंपनीची स्मार्ट असलेली नव्या जनरेशनची स्कूटर सादर करण्यात आली आहे. यामध्ये आता ऍण्टी थेफ्ट अलार्म (चोरांपासून सावध होण्याचा संदेश) आणि कीलेस इंजिन स्टार्ट/स्टॉप सारखी वैशिष्टय़े मिळणार आहेत.

कंपनीने भारतीय बाजारात ऍक्टिव्हा एच स्मार्ट तीन ट्रिम आणि 6 रंगातील पर्यायांसह ही गाडी सादर केली आहे. ऍक्टिव्हाच्या स्टॅण्डर्ड मॉडेलची एक्सशोरुम किंमत 74,536 रुपये, डिलक्स मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 77,036 रुपये ठेवली आहे.

होंडाची ईव्ही दुचाकी लवकरच

गेल्या वर्षी कंपनीने आपली इलेक्ट्रिक स्कूटर इएमआय इ चे अनावरण केले होते. युरोपियन बाजारपेठेसाठी वाहन निर्मात्याची पहिली इलेक्ट्रिक दुचाकी राहणार आहे. यावेळी कंपनीने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षीच्या उन्हाळय़ात स्कूटर सादर करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

नवीन फिचर्स ः

?एचस्मार्टमध्ये 109.51 सीसी सिंगल सिलेंडर, एअर कूल्ड एफआय इंजिन उत्सर्जनानुसार

?स्कूटरच्या मायलेजमध्ये 10 टक्के वाढ होणार असल्याचा कंपनीचा दावा

?स्मार्ट सेफ अँटी थेफ्ट सिस्टमच्या आधारे स्मार्ट नियंत्रित होणार

?गर्दीच्या व पार्किंगच्या ठिकाणी गाडी शोधण्याची सुविधा

?स्मार्ट अनलॉक, गाडी 2 मीटरच्या आत असल्यास सीट, इंधन कॅप व विविध ऑपरेशन नॉबसह हॅण्डल लॉक व अनलॉक पुश करुन अनलॉक सेवा होणार

Related Stories

नव्या सीबी 200 एक्स बाईकचे वितरण सुरु

Patil_p

मर्सिडिझच्या नव्या वर्षात 15 कार्स येणार

Patil_p

महिंद्रातर्फे न्यू बोलेरो मॅक्स पिक-अप सादर

Patil_p

ट्रीम्पची नवी बाईक बाजारात दाखल

Amit Kulkarni

टोयोटा फॉर्च्युनरची विक्री 5 हजार पार

Patil_p

टेस्लाच्या इलेक्ट्रिक कार्सना प्रतिसाद

Patil_p