वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
छत्रपती शिवाजी महाराज की जय, बेळगाव, कारवार, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे… अशा घोषणा देत महाराष्ट्रात जाण्याची तळमळ मनाशी बाळगून कंग्राळी खुर्द येथून शेकडो कार्यकर्ते 1 नोव्हेंबर काळय़ादिनी म. ए. समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये सामील झाले.
तत्पूर्वी गावच्या वेशीमध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन उपस्थित कार्यकर्त्यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो कार्यकर्ते बेळगावकडे निघाले.
मोर्चामध्ये म. ए. समितीचे नेते आर. आय. पाटील, जि. पं. माजी सदस्या सरस्वती पाटील, ता. पं. माजी अध्यक्षा अर्चना अलगोंडी, ग्रा. पं. अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, ग्रा. पं. माजी अध्यक्षा रुक्मिणी निलजकर, प्रेमा जाधव, सचिन शिवनगेकर, प्रशांत पाटील, सुनीता जाधव, भाग्यश्री गौंडवाडकर, बाळू पावशेंसह शेकडो मराठी भाषिक कार्यकर्ते व महिला सहभागी झाल्या होत्या.
कंग्राळी बुद्रुक येथूनही कार्यकर्त्यांचा सहभाग
कंग्राळी बुद्रुक येथून शेकडो म. ए. समिती कार्यकर्ते बेळगाव येथे काढण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये सहभागी झाले. मोर्चामध्ये बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, मयूर बसरीकट्टी, मल्लाप्पा पाटील, शिवा कोळी, बालाजी चव्हाण, सदानंद चव्हाण, प्रशांत पवार, रवि चव्हाण, शंकर पाटील, मदन पवार, योगेश पवार, शंकर चव्हाण, सुभाष चिखलकर, महांतेश चिखलकर, लक्ष्मण हुरुडे, नागेश पवार, तानाजी पाटील, ओमकार चव्हाण, रामा निलजकर, भारता पाटील यांसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.