तरुणभारत ऑनलाइन टीम
बॉलीवुड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी एक दिग्गज अभिनेता म्हणून ओळखला जातो. त्याच्या अभिनयामुळे त्याचा एक वेगळा चाहता वर्ग आहे .अभिनयाची कोणतीही कौटुंबीक पार्श्वभूमी नसताना त्याने चित्रपटसृष्टीत आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. नुकतंच नवाजुद्दीन सिद्दीकीला आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा पुरस्कार त्याला ग्रॅमी अवॉर्ड विजेता अभिनेता विंसेंट डी पॉल यांच्या हस्ते देण्यात आला.
नवाजुद्दीन सिद्दीकीला हा फ्रेंच रिवेरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये हा पुरस्कार देण्यात आला. या आधीही नवाजुद्दीन सिद्दीकीला बऱ्याच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अभिनय सृष्टीतील नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आतापर्यंतच्या कामगिरीसाठी ‘एक्सेलन्स इन सिनेमाज’ हा पुरस्कार त्याला फ्रेंच रिवेरा फिल्म फेस्टिव्हलमध्ये देण्यात आला.या पुरस्काराचे फोटो त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहेत.