Tarun Bharat

अभिनेते सयाजी शिंदेंवर मधमाशांचा हल्ला

महामार्गावर तळबीड येथील घटना; किरकोळ दंश झाल्याने सुखरूप

प्रतिनिधी/   उंब्रज

तळबीड (ता.कराड) येथे आशियाई महामार्गालगत सुरू असलेल्या वृक्षतोडी दरम्यान वृक्षांचे पुनर्रोपण करण्यासाठी थांबलेल्या अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यातून अभिनेते सयाजी शिंदे बचावले असून त्यांना किरकोळ दंश झाला आहे. मधमाशा शांत झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनी वृक्ष पुनर्रोपणाच्या कामाला पुन्हा सुरुवात केली आहे.

महामार्ग सहापदरीकरणासाठी मोठय़ा प्रमाणावर झाडे तोडली जात आहेत. वृक्ष संवर्धनासाठी झटणाऱया अभिनेते सयाजी शिंदे यांनी तळबीड-तासवडे येथे तुटणारी काही झाडे वाचवण्यासाठी व झाडांचे पुनर्रोपण करण्यासाठी पुढाकार घेतला असून या अनुषंगाने सकाळी ते महामार्गावर तळबीड गावच्या हद्दीत थांबून वृक्षतोड करणाऱया कर्मचाऱयांशी संवाद साधत होते. त्यावेळी शेजारी असणाऱया वडाच्या झाडाच्या फांद्या तोडण्याचे काम मशिनरीच्या साहाय्याने सुरू होते. त्यावेळी झाडावर असणाऱया मधमाशांनी तेथे उपस्थित असणाऱया लोकांवर व वाहनचालकांवर हल्ला केला. अभिनेते सयाजी शिंदेही येथे होते त्यांनाही सुमारे तीन मधमाशांनी चावा घेतला. मधमाशांनी हल्ला करताच शिंदे गाडीत जाऊन बसल्याने अनर्थ टळला. मात्र मधमाशा शांत झाल्यानंतर त्यांनी झाडे पुन्हा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. वाचण्यासारखी झाडे वहागाव येथे पुन्हा लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी सकाळी महामार्गावरून अभिनेते सयाजी शिंदे प्रवास करत होते. दरम्यान वहागाव, तळबीळ, तासवडे गावच्या हद्दीत सध्या महामार्ग रुंदीकरणाचे काम जोमात सुरू असून झाडे तोडण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.  सकाळी झाडे तोडण्याचे काम सुरू असताना अभिनेते सयाजी शिंदे यांनी थांबून पाहणी केली. मोठय़ा प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पाहणी करताना शेजारी असणाऱया झाडावरील मधमाशांनी हल्ला केल्याने एकच भंबेरी उडाली. सयाजी शिंदे यांनाही मधमाशांनी चावा घेतला.ते गाडीत जाऊन बसल्याने यातून बचावले. मात्र मधमाशा शांत झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनी पुन्हा झाडांच्या पुनर्रोपणसाठी काम सुरू केले. तळबीड, बेलवडे येथील जी झाडे सुस्थितीत आहेत, ती काढून वहागावच्या हद्दीत पुन्हा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोशल मिडियावर व्हीडीओ व्हायरल झाल्याने सयाजी शिंदे यांनीही व्हीडीओद्वारे माहिती देत सुखरूप असल्याचे सांगितले.

झाडे वाचली पाहिजेत, यासाठी प्रयत्न

तळबीड येथे जी झाडे तोडली जात आहेत. ती वाचली पाहिजेत, यासाठी वहागाव येथे 15 ते 20 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे. झाडे वाचली पाहिजे, यासाठी आज येथे आलो असताना मधमाशांचा हल्ला झाला मात्र काही अडचण नाही. रस्ता रुंदीकरणात झाडे वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. झाडे वाचली पाहिजेत. दोनशे वर्षांपूर्वीची झाडे मुळातून कापायची व त्याच्या बदल्यात दोन-तीन झाडे लावायची. त्याचा पाठपुरावा होत नाही.  झाडे वाचली पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अभिनेते सयाजी शिंदे

Related Stories

कोयने पाठोपाठ वारणेचा विसर्ग कमी; कृष्णा सुरक्षित पाणी पातळीवर

Archana Banage

Satej Patil जबाबदारी वाढली…आव्हानेही वाढणार; सतेज पाटील यांच्या निवडीने कार्यकर्त्यांत उत्साह

Abhijeet Khandekar

Sangli : बेपत्ता चिमुरड्या बहिण- भावाचा मृतदेह सापडले विहिरीत, अमृतवाडीतील ह्रदयद्रावक घटना

Abhijeet Khandekar

तुम्ही मुंबईत या, मी स्वतः तुमच्या स्वागताला येईन- संजय राऊत

Archana Banage

पालिकेच्या तीन गाडय़ा भंगारात

Patil_p

संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे काय झाले ?

Tousif Mujawar