ऑनलाईन टीम/तरुण भारत
अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे पोलिसांनी शनिवारी १८ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. रविवारी सकाळी केतकीला ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं होतं. न्यायालयात सुनावणीवेळी केतकीने वकिल न घेताच स्वत: युक्तीवाद केला. यावेळी ठाणे सत्र न्यायालयाने केतकीला पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
केतकी चितळे कोर्टात काय म्हणाली?
सोशल मीडियावरील टाकली पोस्ट माझी नाही. ती मी सोशल मीडियातून कॉपी करुन पोस्ट केली होती. सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करणं गुन्हा आहे का? असा सवाल केतकी चितळेने उपस्थित केला. केतकीने सुनावणीदरम्यान वकील घेतला नाही, ती स्वतः कोर्टात युक्तिवाद केला. केतकीनं सांगितलं की मी या पोस्ट मी डिलीट करणार नाही. माझा तो अधिकार आहे, अशी ठाम भूमिकाही केतकीने घेतली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १८ मे रोजी होईल.
रविवारी सकाळी केतकीला ठाणे सत्र न्यायालयात दाखल करण्यापूर्वीपासूनच न्यायालयाबाहेरील परिसरात राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या अनेक महिला कार्याकर्त्या उपस्थित होत्या. त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून केतकीच्या अटकेची मागणी केली जात होती.