Tarun Bharat

केतकी चितळेच्या अडचणी वाढल्या; अ‍ॅट्रोसिटी प्रकरणात ५ दिवस पोलीस कोठडी

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यांनतर अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) हिला ठाणे पोलिसांनी अटक केली होती. आत तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार केतकीला अटक झाली असून ठाणे सत्र न्यायालयाने तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ठाणे मध्यवर्ती कारागृहातून केतकीला रबाळे पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले होते. त्यानंतर तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले. 

दरम्यान, विशिष्ट समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी केतकी चितळे हिला ठाणे सत्र न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट केल्यामुळं सध्या न्यायालयीन कोठडीत असलेली अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.

केतकी चितळे हिने १ मार्च २०२० रोजी फेसबुकवर एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली होती. यात धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप तिच्यावर आहे. केतकीनं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क, आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो”. अशी पोस्ट केतकीने केली आहे. याच प्रकरणात तिच्यावर तेव्हा अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला होता.

Related Stories

पुणे विभागातील 2 लाख 63 हजार 747 रुग्ण कोरोनामुक्त 

Rohan_P

कुकुडवाड येथे पुतण्याकडून चुलत्याचा खून

Patil_p

कोल्हापूर : चिंचवाडमध्ये दोन गटात तुंबळ हाणामारी, २१ जणांवर गुन्हे दाखल

Abhijeet Shinde

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगची दहशत; यांची झाली हत्या…

Kalyani Amanagi

जावली तहसिलदारांना ठेकेदाराकडून कोटय़वधीचा चुना

Patil_p

चिपळुणात लाल, निळी रेषा निर्बंध उठवणे अशक्य!

Sumit Tambekar
error: Content is protected !!