मुंबई
अभिनेत्री सोनम कपूर हिने शनिवारी एका मुलाला जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर कपूर कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नाही. नीतू कपूरने एक पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. सोनम कपूरची आई सुनीता कपूर यांनीही सदर पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. नीतूने शेअर केलेली पोस्ट सोनम आणि आनंद आहुजा यांनी जारी केलेले निवेदन आहे. या निवेदनात सोनम-आनंद यांनी डॉक्टर, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. ‘आमचे जीवन कायमचे बदलले आहे’ असेही द्वयींनी स्पष्ट केले आहे.
सोनम कपूर 2018 मध्ये बिझनेसमन आनंद आहुजासोबत लग्नाच्या बेडीत अडकली होती. लग्नानंतर सोनम पतीसोबत लंडनला शिफ्ट झाली. तथापि, मुंबईशी असलेले त्यांचे नाते आजही कायम आहे. सोनम आणि आनंदने यावषी मार्चमध्ये गरोदर असल्यासंबंधीची माहिती जारी करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता.