नवी दिल्ली
अब्जाधिश व प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी कॅपिटलचा आयपीओ 2024 मध्ये बाजारात लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे. कंपनी सदरच्या नियोजीत आयपीओतून 1500 कोटी रुपये उभारणार आहे, असेही समजते. या माध्यमातून कंपनीचे बाजार मूल्य 2 अब्ज डॉलर्सवर पोहचवायचे आहे. शेतकरी व लघु-मध्यम व्यवसाय करु इच्छिणाऱयांना कंपनी कर्ज देऊ करते.