ड्रोन निर्मात्या जनरल एअरोनॉटिक्समध्ये 50 टक्के वाटा : करार किंमत गुलदस्त्यात
वृत्तसंस्था/ बेंगळूर
विविध क्षेत्रात अधिग्रहण करणाऱया गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी समूहाने हवाई उद्योगात आपले पाय रोवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार ड्रोन निर्माती बेंगळूरमधील स्टार्टअप कंपनी जनरल एअरोनॉटिक्समध्ये 50 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याचा निर्णय अदानी समूहाने घेतल्याचे समजते.
अदानी समूह संरक्षण क्षेत्रामध्ये आपला वाटा उचलण्यासाठी प्रयत्न करत असून अदानी डिफेन्स सिस्टीम अँड टेक्नॉलॉजी यांच्यामार्फत जनरल एअरोनॉटिक्समध्ये हिस्सेदारी खरेदीचा करार केला आहे. अदानी डिफेन्सचे सीईओ आशिष राजवंशी यांनी ही माहिती शेअरबाजाराला दिली आहे.
ड्रोन्स निर्मितीवर भर
या करारांतर्गत कंपनी येणाऱया काळामध्ये स्थानिक कृषी क्षेत्रावरही भर देणार आहे. जनरल एअरोनॉटिक्स कृषी क्षेत्रासाठी काम करत असते. रोबोटिक ड्रोन बनविण्याचे काम जनरल एअरोनॉटिक्सकडून केले जाते. हे ड्रोन पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रयत्न करत असतात. यासाठी त्यांचा वापर केला जातो. अदानी समूहा या ड्रोनच्या निर्मितीवर भर देईल, असे दिसते.
31 जुलैपर्यंत व्यवहार होणार पूर्ण
31 जुलैपर्यंत हिस्सेदारी खरेदीचा व्यवहार पूर्ण होण्याची शक्मयता वर्तविली जात आहे. सदरचा व्यवहार किती रुपयांना झाला आहे, याची माहिती मात्र देण्यात आलेली नाही.