ऑनलाईन टीम/तरुण भारत
adani data networks latest news :आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) आता दूरसंचार क्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहेत. अदानीची कंपनी अदानी डेटा नेटवर्क लिमिटेड (ADNL) ला दूरसंचार सेवांसाठी एकात्मिक दूरसंचार (Integrated Telecom License) परवाना मिळाला आहे. परवाना मिळाल्यानंतर, आता एडीएनएल (ADNL) देशात सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदान करू शकते.
अदानी समुहाला दूरसंचार परवाना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अदानी समूहाला एकात्मिक दूरसंचार परवाना देण्यात आला आहे. देशात अलीकडेच झालेल्या 5G स्पेक्ट्रम लिलावात स्पेक्ट्रम खरेदी केल्यानंतर अदानी समूहाने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. स्पेक्ट्रम खरेदी करताना, कंपनीने सांगितले होते की या स्पेक्ट्रमचा समूहातील व्यावसायिक क्रियाकलापांसाठी वापर करण्यात येईल.
हे ही वाचा : Andheri East Assembly Bypoll : ऋतुजा लटके यांची उच्च न्यायालयात धाव, उद्या होणार तातडीची सुनावणी
अदानी समूहाकडून सुपर एअरवेवचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे वीजवितरणासह विमानतळांवर सुपर एअरवेवचा वापर करता येणार आहे. अदानी डेटा नेटवर्कला युएल देण्यात आले आहे. आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, मुंबई (महाराष्ट्र) या सहा ठिकाणीच टेलिकॉम सेवा पुरवण्यासाठी परवाना देण्यात आला आहे. त्यामुळे सुरुवातीला अदानीकडून याच सहा ठिकाणी फाईव्ह जी सेवा मिळणार आहे.
प्रथमच मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात थेट स्पर्धा
देशातील दोन दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत दोघे वेगवेगळ्या क्षेत्रात व्यापार करत होते आणि दोघांमध्ये थेट स्पर्धा नव्हती. एकीकडे मुकेश अंबानींचा (Mukesh Ambani) रिलायन्स समूह तेल, रिफायनरी, पेट्रोकेमिकल्स ते टेलिकॉम आणि रिटेल क्षेत्रात काम करतो. दुसरीकडे, अदानी समूह बंदरे, कोळसा, हरित ऊर्जा, वीज वितरण आणि विमान वाहतूक क्षेत्रात काम करतो. पण आता दूरसंचार क्षेत्रात या दोघांमध्ये थेट स्पर्धा पाहायला मिळणार आहे.