वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या अदानी लॉजिस्टिक्सने मंगळवारी सांगितले की त्यांनी आयसीडी टंब (वापी) (अंतर्देशीय कंटेनर डेपो) घेण्यासाठी नवकार कॉर्पसोबत करार केला आहे. हा बंधनकारक करार 835 कोटी रुपयांचा असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली आहे.
अदानी लॉजिस्टिक लिमिटेडने एका निवेदनात म्हटले आहे, की या करारामध्ये ऑपरेशनल आयसीडीचे अधिग्रहण समाविष्ट आहे, ज्याची पाच लाख (वीस फूट समतुल्य युनिट्स) हाताळण्याची क्षमता आहे. हझिरा बंदर आणि न्हावा शेवा बंदर यांच्यादरम्यान नवकारचा डेपो स्थित असल्याचे सांगितले जाते. तोच आता अदानी समूहाने खरेदी केल्याचे सांगितले जाते. औद्योगिक वर्दळीचा हा विभाग असल्याने अदानी समूहाला आपल्या व्यवसायासाठी या व्यवहाराचा आगामी काळात लाभ होणार आहे.
एकात्मिक वाहतुकीला ठरणार लाभदायक
हे अधिग्रहण एकात्मिक वाहतूक उपयुक्तता आणि संपूर्ण भारतातील लॉजिस्टिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या धोरणानुसार आहे. टंबने अदानी लॉजिस्टिकच्या विद्यमान पोर्टफोलिओमध्ये सात मल्टी-मॉडल लॉजिस्टिक पार्क जोडले आहेत.