Tarun Bharat

अदानींची होणार विविध क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक

Advertisements

फोर्ब्स ग्लोबल सीईओ कॉन्फरन्समध्ये अदानी यांनी उलगडला समूहाच्या गुंतवणुकीचा आलेख

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जगातील तिसरा सर्वात मोठा गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखाली असणारा अदानी समूह पुढील दशकात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक प्रामुख्याने नवीन ऊर्जा आणि डाटा सेंटरसह डिजिटल क्षेत्रात केली जाईल, अदानी यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

  यामधील जवळपास 70 टक्के गुंतवणूक ऊर्जा क्षेत्रात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रीन हायड्रोजनमुळे भारत एक दिवस निव्वळ ऊर्जा निर्यातदार होऊ शकतो, असा दावा अदानी यांनी केला.

फोर्ब्स ग्लोबल सीईओ कॉन्फरन्समध्ये अदानी म्हणाले, ‘एक समूह म्हणून आम्ही पुढील दशकात 100 अब्ज डॉलरपेक्षा जास्त भांडवल गुंतवणार आहे. यातील 70 टक्के गुंतवणूक आम्ही ऊर्जा क्षेत्रासाठी राखून ठेवली आहे.’ असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. सिंगापूरमध्ये या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अदानी म्हणाले, ‘आमच्या विद्यमान 20 गीगावॅट अक्षय पोर्टफोलिओशिवाय, नवीन व्यवसाय 45 गीगावॅट संकरित अक्षय ऊर्जा निर्मितीद्वारे क्षमता वाढविली जाईल. हा उपक्रम 100,000 हेक्टर जमिनीवर पसरलेला आहे, जो सिंगापूरच्या क्षेत्रफळाच्या 1.4 पट आहे.

गिगा कारखाने

पोर्ट-टू-एनर्जी ग्रुप आगामी काळात 45 गीगा संकरित अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता जोडेल. याशिवाय सोलर पॅनल, विंड टर्बाइन आणि हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर तयार करण्यासाठी तीन कारखाने सुरू केले जाणार आहेत. समूह तीन गिगा कारखानेही उभारणार असून 10 गीगावॅटचा प्रकल्प, 10 गीगावॅट एकात्मिक पवन टर्बाइन आणि 5 गीगावॅट हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर कारखाना यांचा समावेश आहे.

ग्रीन डाटा सेंटर उभारणार

भारतीय डाटा सेंटर मार्केट झपाटय़ाने वाढत आहे. हे क्षेत्र जगातील इतर कोणत्याही उद्योगापेक्षा जास्त ऊर्जा वापरते आणि म्हणूनच ग्रीन डाटा सेंटर तयार करण्याचे ध्येय आहे.

Related Stories

‘युनिकेम’चा गुंतवणूकदारांना दमदार परतावा

Amit Kulkarni

फोर्ड इंडियाकडून उत्पादनाला प्रारंभ

Patil_p

ग्राहकांसाठी व्हॉट्सऍपकडून नवे फिचर

Patil_p

अशोक लेलँडचा इ-वाहनांचा स्वतंत्र कारखाना

Patil_p

2022-23 मध्ये निर्यातीत वृद्धी होण्याची शक्यता

Patil_p

लेदर निर्यात परिषदेच्या अध्यक्षपदी संजय लीखा

Patil_p
error: Content is protected !!