Tarun Bharat

आदर्शनगर रहिवाशांतर्फे विद्यार्थ्यांचा गौरव

संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दहावी-बारावीतील गुणवंतांचा सन्मान

प्रतिनिधी /बेळगाव

श्री राम कॉलनी, आदर्शनगर रहिवासी संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त दहावी व बारावी परीक्षेत उत्कृष्ट गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान नुकताच गंगा-नारायण सभागृहामध्ये पार पडला.

 प्रमुख पाहुणे म्हणून वॉर्ड क्र. 8 चे नगरसेवक मंगेश पवार, पायोनियर बँकेचे संचालक अनंत लाड तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. मायाप्पा पाटील उपस्थित होते. अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष विलास घाडी व व्यासपीठावर कार्याध्यक्ष एम. एम. पट्टणशेट्टी व महिला मंडळाच्या अध्यक्षा नेहा जोशी उपस्थित होत्या.

उपस्थितांचे स्वागत संस्थेच्या पदाधिकाऱयांच्यावतीने करण्यात आले. विद्यार्थ्यांचा गुणगौरव करताना प्रा. पाटील म्हणाले की, जीवनात खूप मोठे व्हा, मोठमोठी पदे प्राप्त करा, पण त्याचबरोबर माणुसकी विसरू नका, असे सांगितले. अनंत लाड यांनी, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. कष्टाशिवाय काहीही मिळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने प्रामाणिकपणे कष्ट करताना वेळेचा सदुपयोग करून आयुष्यात यशस्वी व्हावे, असे सांगितले.

विद्यार्थ्यांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले तर ते जीवनात अधिक सक्षमपणे यशस्वी होऊ शकतात, असे सांगून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक नगरसेवक मंगेश पवार यांनी केले. पाहुणे व पदाधिकाऱयांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.

सूत्रसंचालन बी. एम. घोरपडे यांनी केले. स्वागतगीत सुनीता घाडी व भावना खन्नूकर यांनी गायिले. प्रास्ताविक नेहा जोशी यांनी केले. पाहुण्यांची ओळख वर्षा घाडी यांनी तर सेपेटरी उमेश वाळवेकर यांनी आभार मानले. सत्कार समारंभापूर्वी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला.

Related Stories

गारुडय़ांकडील साप सोडला जंगलात

Patil_p

अनुरूप विवाह संस्थेची शाखा बेळगावमध्ये कार्यरत

Amit Kulkarni

कर्नाटकः कोविड -१९ च्या निधीच्या गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसची न्यायालयीन चौकशीची मागणी

Archana Banage

महिला आघाडीतर्फे फराळ स्टॉलचे उद्घाटन

Amit Kulkarni

स्मार्ट सुविधांसह खड्डेमय रस्त्यांची सोबत

Amit Kulkarni

दर्शन रावळ, सीयाना कॅथरीन यांची उद्या लाईव्ह कॉन्सर्ट

Amit Kulkarni