एडीबीने 2022-23 साठी भारताचा विकास दर अंदाज घटविला
नवी दिल्ली
आशियाई विकास बँक यांनी (एडीबी) वर्ष 2022-23 साठीचा भारताचा आर्थिक विकासाचा अंदाज अगोदर निश्चित केलेल्या 7.5 टक्क्यांवरुन तो आता 7 टक्के राहणार असल्याचे म्हटले आहे. सदरच्या निर्णयामागचे कारण जागतिक मागणीत झालेली घट व आर्थिक स्थितीमधील अस्थिरता असल्याचे सांगितले आहे.
याआधी 2022-23 वर्षासाठी या वर्षी एप्रिलमध्ये 7.5 दर एडीबीने घोषित केला होता. एडीबीने आपल्या अहवालात अतिरिक्त माहिती देताना म्हटले आहे, की सध्याला जागतिक मागणीत घट असून सर्वच क्षेत्रावर दबाव दिसतो आहे. तेलासह इतर वस्तुंवरच्या किंमतीवरही दबाव वाढताना दिसतो आहे. हे सर्व पाहूनच एडीबीने वरील सुधारीत अंदाज जीडीपीबाबत घटवला असल्याचे सांगण्यात येते.
आर्थिक वर्ष 2023-24 साठीचा अंदाजही काहीसा कमी वर्तवला आहे. आधीच्या 8 ऐवजी आता 7.2 टक्के अंदाज वर्तवला आहे.