Tarun Bharat

मांद्रे सरपंचपदी ऍड. अमित सावंत यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी /मोरजी 

सरपंचपदी निवड होताच 24 तासांच्या आत महेश कोनाडकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून तो मंजूर झाल्यानंतर मंगळवारी 6 रोजी ऍड. अमित शेटगावकर यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. अखेर माजी आमदार दयांनद सोपटे यांनी घडवलेली मांदे पंचायत आपल्या ताब्यात घेण्यात आमदार जित आरोलकर यांना यश आले आहे. गोव्यातील सरपंच निवडी नंतर मांद्रे पंचायतीच्या सरपंचाविरुद्ध लगेच आलेल्या या अविश्वास ठरवावर सर्वत्र उलट-सुलट चर्चा झाली होती.

  या मंडळाने एकसंघ राहून 5 वर्षे पंचायतीवर राज्य करणार असल्याचा दावा केला आहे. ऍड. अमित सावंत यांच्या रूपाने गट सुशिक्षित सरपंच मांदे पंचायतीला लाभला आहे, असा दावा त्यांच्या समर्थकांनी केला आहे. राजकारणात कुणीही कुणाचा कायमस्वरूपी मित्र आणि शत्रू नसतो. हे एकदा दाखवून देण्याचे काम मांदे पंचायत मंडळांनी केले आहे. महेश कोनाडकर यांच्याविरुद्ध 24 तासाच्या आत अविश्वास ठराव आणून तो मंजूर करण्याचा इतिहास मांद्रे पंचायत मंडळाने घडवला. आता उपसरपंच म्हणून असलेल्या चेतना पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव येण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.

  तत्कालीन सरपंच महेश कोनाडकर यांच्याविरुद्ध मागच्या दहा दिवसांपूर्वी अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार करण्यासाठी एकूण सात पंच सदस्यांनी त्यांच्या आसनाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला. थेट सातही पंच सदस्य रेडी येथील स्वयंभू गणेश मंदिरात आमदार जीत आरोलकर यांच्या उपस्थितीत अलिखित करार केला. त्यानुसार मंगळवारी अमित सावंत यांची दोन वर्षांसाठी सरपंचपदी निवड करण्यात आली. सरपंच निवडणूक प्रक्रियेवेळी मावळते सरपंच महेश कोनाडकर हे गैरहजर राहिले.

Related Stories

काँग्रेस उमेदवारांनी घेतली देवी महालक्ष्मीची शपथ

Patil_p

फोंडय़ात 30 रोजी शिमगोत्सव मिरवणूक

Amit Kulkarni

नवे बाधित 2030, बळी 52

Amit Kulkarni

राष्ट्रपती राजवट लागू करून मंत्री, आमदारांना ‘होम क्वॉरंटाईन’ करा

Omkar B

धेंपो स्पोर्ट्स क्लबची जर्सी कोविड वॉरियर्सना समर्पित

Omkar B

राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा

Amit Kulkarni