बेळगाव बार असोसिएशनतर्फे सत्कार
प्रतिनिधी / बेळगाव
सरकारी वकील म्हणून ऍड. सचिन शिवण्णावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. प्रभू यत्नट्टी यांच्यासह इतर सदस्यांनी त्यांचा सत्कार केला आहे.
ऍड. सचिन शिवण्णावर हे बेळगाव न्यायालयामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वकिली व्यवसाय करत आहेत. त्यानंतर आता त्यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अत्यंत कमी वयामध्ये त्यांची ही नियुक्ती झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. यावेळी मुख्य जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश मोहन पै उपस्थित होते.
सत्कारप्रसंगी बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ऍड. सुधीर चव्हाण, जनरल सेपेटरी ऍड. गिरीराज पाटील, जॉईंट सेपेटरी ऍड. बंटी कपाई, सदस्य ऍड. इरफान बयाळ, महिला प्रतिनिधी पूजा पाटील यांच्यासह इतर सदस्य व वकील उपस्थित होते.