जालंधर : पंजाबच्या जालंधरमध्ये एका इसमाने माहेरी पोहोचलेली पत्नी, मुलगा, मुलगीसमवेत सासूसासऱयांना जिवंत जाळले आहे. कुटुंबीय झोपलेले असताना आरोपीने खोलीत आग लावल्याने त्यांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. मृतांमध्ये 5 आणि 5 वर्षे वय असलेल्या मुलांचा समावेश आहे. पती आणि पत्नीमध्ये वाद सुरू होता आणि यातूनच पत्नी माहेरी आली होती. यामुळे संतापलेल्या पतीने या सर्वांचा जीव घेतला आहे. संबंधित इसम हा अमली पदार्थांच्या आहारी गेला असून त्याचे नाव काली सिंह आहे. काली सिंहने पूर्ण कुटुंब झोपलेले असताना खोलीला बाहेरून कडी लावत आतमध्ये पेट्रोल ओतले आणि आग लावली. आग लागल्यावर कुटुंबीयांचा चित्कार ऐकून देखील काली सिंहला दयेचा पाझर फुटला नव्हता. या घटनेची माहिती पोलीस आणि फोरेन्सिक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. काली सिंहला अटक करण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत.
Previous Articleप्रभु तू दयाळू कृपावंत दाता
Next Article दुधाचे दर आणखी वाढणार; चेतन नरकेंचं मत
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.