बागायत खात्याकडून प्रशिक्षण : नैसर्गिक मधाबरोबर प्रेम लावून मधाचे उत्पादन करणाऱया शेतकऱयांच्या संख्येत वाढ
प्रतिनिधी / बेळगाव
बागायत खात्यामार्फत शेतीला जोड व्यवसाय म्हणून मधमाशी पालनाचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यामुळे अलीकडे मधाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. नैसर्गिक मधाबरोबर प्रेम लावून मधाचे उत्पादन करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बागायत खात्याचे प्रशिक्षण अनेकांना आधार ठरत आहे. दरवषी जुलै महिन्यात खात्यामार्फत मोफत प्रशिक्षण देऊन मध उत्पादनासाठी साहित्य उपलब्ध करून दिले जाते. यंदा देखील जांबोटी येथील प्रशिक्षण कार्यालयात लवकरच प्रशिक्षण दिले जाणार आहे.
बागायत खात्याचे प्रशिक्षण घेऊन गतवषी शेतकऱयांनी 8991 किलो मधाचे उत्पादन केले होते. त्यातून 26.81 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते. दरवषी प्रशिक्षण घेऊन मध उत्पादन करणाऱया शेतकऱयांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मधाच्या उत्पादनातदेखील वाढ होत आहे. जांबोटी वन्य परिसरात मधाचे उत्पादन अधिक प्रमाणात होत आहे. याबरोबर इतर ठिकाणीही मध उत्पादन केले जात आहे.
शेती व्यवसाय संकटात
वाढती महागाई, पावसाचा अनिश्चितपणा, अयोग्य हमीभाव आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकरी जोडव्यवसाय म्हणून इतर व्यवसायांकडे वळले आहेत. त्यामध्ये मधमाशी पालन याचा देखील समावेश आहे. जिल्हय़ात एक हजारांहून अधिक शेतकरी आज मधमाशी पालन करीत आहेत. त्यामुळे शेतीलादेखील हातभार लागून अर्थार्जन होत आहे. बाजारात मधाला अधिक मागणी आणि दर असल्याने फळ आणि फूल शेती करणारे शेतकरी याकडे आकर्षित होत आहेत.
जांबोटी परिसरात अधिक मत उत्पादन
जिल्हय़ात बेळगाव, खानापूर, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, रामदुर्ग, सौंदत्ती, बैलहोंगल आदी तालुक्मयांतून मधमाशी पालनासाठी शेतकरी पुढे सरसावत आहेत. विशेषतः खानापूर तालुक्मयातील जांबोटी परिसरात मधाचे उत्पादन करणाऱया शेतकऱयांची संख्या अधिक आहे. जांभूळ, आंबा, काजू, पेरू, सुर्यफूल यासह विविध पुष्पांमधील परागकण आणि मकरंद मधमाशा जमा करतात. त्यामुळे फळ-फूल शेतीत मधाचे उत्पादन अधिक प्रमाणात होते. याबरोबरच मधमाशांपासून परागीभवन होत असल्याने शेतीच्या उत्पादनातही वाढ होते. त्यामुळे मधमाशी पालन शेतकऱयांना फायदेशीर ठरणार आहे.
बागायत खात्यामार्फत शेतकऱयांना मधमाशी पालनासाठी मोफत प्रशिक्षण दिले जाते. त्याबरोबर प्रत्येक तालुक्मयातील 9 शेतकऱयांना मधाच्या प्रेम दिल्या जातात. त्या प्रेम शेतात लावून मधाचे उत्पादन घेता येते. कमी खर्चात आणि खात्याच्या प्रोत्साहनामुळे मधमाशी पालन करणे सोयीस्कर होत आहे.
तालुके | मधमाशी पालन करणाऱया शेतकऱयांची संख्या |
बैलहोंगल | 100 |
बेळगाव | 120 |
चिकोडी | 62 |
गोकाक | 48 |
हुक्केरी | 62 |
खानापूर | 544 |
रायबाग | 35 |
रामदुर्ग | 39 |
सौंदत्ती | 51 |