लागवड सोयीस्कर फळ-फुलांच्या क्षेत्रात वाढ : स्थानिक शिवारात फुलू लागल्या नवनवीन बागा
बेळगाव : बागायतखाते विविध योजना राबवून बागायत क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. विविध रोपांना अनुदान उपलब्ध करून उत्पादनात वाढ करण्यासाठी धडपड सुरू आहे. आंबा, काजू, शेवग्याच्या शेंगा, भाजीपाला यासह इतर बागायती पिकांना अनुदान देवून बागा फुलवण्यासाठी प्रयत्न वाढले आहेत. यामुळे स्थानिक शिवारात नवनवीन बागा फुलू लागल्या आहेत. स्थानिक ठिकाणी देखील आता शेवग्याची झाडे बहरू लागली आहेत. खात्यामार्फत नरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करूने दिले जाते. बेळगाव, सौंदत्ती, अथणी, कागवाड, हुक्केरी, गोकाक आदी परिसरात बागायतक्षेत्र वाढू लागले आहे. नरेगा अंतर्गत खोदाई, रोपांची लागवड आणि संवर्धन देखील केले जात आहे. त्यामुळे विविध फळांची आणि फुलांची झाडे हिरवाईने नटू लागली आहेत. त्यामुळे नरेगा योजनेचा आता बागायती शेतीसाठी फायदा होवू लागला आहे.
स्थानिक वातावरणातील रोप लागवडीला प्राधान्य
दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान विविध रोपे दिली जात आहेत. याला नरेगा योजनेची जोड देत लागवड केली जात आहे. त्यामुळे दरवर्षी हळुहळू फळझाडांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे सहाजीकच जिल्ह्यात फलोत्पादनात वाढ होवू लागली आहे. स्थानिक वातावरणात येणाऱ्या रोप लागवडीला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे पोषक वातावरण आणि नरेगाची साथ यामुळे बागायत क्षेत्रात वाढ होवू लागली आहे. त्यामुळे विविध फळांचे उत्पादन देखील होवू लागले आहे.
बागायत क्षेत्र वाढ
जिल्ह्यात सर्वत्र नरेगा योजनेंतर्गत विविध फळा-फुलांच्या रोपांची लागवड केली जात आहे. त्यामुळे उत्पादनात देखील वाढ झाली आहे. बागायत क्षेत्र वाढले आहे. पावसाळ्यात रोप लागवडीला प्राधान्य दिले जाते. जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान उत्पादन सुरू होते. नरेगा योजनेची बागायत खात्याला साथ मिळत आहे.
महांतेश मुरगोड (सहसंचालक बागायत खाते)