म्युच्युअल फंड संघटनेची माहिती ः 31 टक्के यावर्षी दिसली वाढ
नवी दिल्ली
सिस्टिमिटीक इन्व्हेस्टमेंट प्लान अर्थात एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडांमध्ये मागच्या वर्षी बाजारात अनिश्चिततेचे वातावरण असतानाही गुंतवणूक बऱयापैकी दिसून आली. वर्ष 2022 मध्ये एसआयपीच्या माध्यमातून दीड लाख कोटींची गुंतवणूक करण्यात आली आहे. सदरची माहिती असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया यांनी दिली आहे.
एक वर्षाच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी गुंतवणूक 31 टक्के इतकी वाढली आहे. शेअर बाजारामध्ये चढ-उतार असतानाही गुंतवणूक चांगली राहिली आहे,
ही जमेची बाब राहिली आहे. 2021 मध्ये म्युच्युअल फंडांमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी 1.14 लाख कोटी रुपये गुंतवले होते.
याच तुलनेत 2020 मध्ये 97 हजार कोटी रुपयांची भर घालण्यात आली. एसआयपी म्युच्युअल फंड योजनेत व्यक्तीगत स्तरावर एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूकदार गुंतवणूक करू
शकतो.
500 रुपयेही करता येते गुंतवणूक
महत्त्वाचे म्हणजे महिन्याला 500 रुपये इतकी गुंतवणूक योजनांमध्ये तो करू शकतो.
एसआयपीमधील गुंतवणुकीचे महत्त्व अनेकांना समजून आले असल्याने दिवसेंदिवस यामध्ये गुंतवणूक करणाऱयांची संख्या वेगाने वाढताना दिसते आहे. येणाऱया काळातही नव्या गुंतवणूकदारांची संख्या वाढीवच राहिल, असा अंदाज वर्तविला जात आहे.
13 हजार कोटीहून अधिक गुंतवणूक
डिसेंबर 2022 मध्ये एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड योजनांमध्ये 13,573 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. ही गुंतवणूक सर्वाधिक मानली जात आहे. त्याचप्रमाणे उल्लेखनीय बाब ही की सलग तिसऱया महिन्यामध्ये गुंतवणूकीचा टप्पा 13 हजार कोटीचा टप्पा पार करू शकली आहे.