Tarun Bharat

सौंदत्ती यात्रेसाठी धावणार अतिरिक्त बस

Advertisements

यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी 60 जादा बस

प्रतिनिधी/ बेळगाव

कर्नाटक-महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील यल्लम्मा यात्रेसाठी बेळगाव बसस्थानकातून जादा बस धावणार आहेत. नवरात्रौत्सव काळात प्रवाशांच्या सोयीखातर बेळगाव-सौंदत्ती मार्गावर तब्बल 60 अतिरिक्त बस सोडल्या जाणार आहेत. सोमवारपासून ही अतिरिक्त बससेवा सुरू केली जाणार आहे, अशी माहिती परिवहनचे विभागीय नियंत्रण अधिकारी पी. वाय. नाईक यांनी दिली.

नवरात्रौत्सव काळात सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱया भाविकांची संख्या अधिक असते. दरम्यान प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी परिवहनने अतिरिक्त 60 बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरवषी यात्रा-जत्रा, पर्यटन आणि इतर विशेष कार्यक्रमांसाठी परिवहनकडून जादा बस सोडल्या जातात. त्याचबरोबर यंदादेखील सौंदत्ती यात्रेसाठी जादा बस धावणार आहेत. शिवाय प्रवाशांच्या सोयीखातर विनाथांबा बससेवादेखील धावणार आहे. दरम्यान नवरात्रौत्सव काळात प्रवाशांची मागणी वाढल्यास पुन्हा जादा बस सोडण्याचा निर्णयही परिवहनने घेतला आहे.

सौंदत्ती यल्लम्मा यात्रेसाठी बाहेरील आगारातून 25 बस मागविण्यात आल्या असून विशेष बससेवा सज्ज करण्यात आली आहे. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत मंदिरे, यात्रा-जत्रांवर निर्बंध आले होते. त्यामुळे परिवहनलादेखील फटका बसला होता. मात्र यंदा सण-उत्सव पूर्ववत सुरू झाल्याने यात्रांना भाविकांची गर्दी वाढत आहे. सौंदत्ती येथील यात्रेसाठी बेळगावसह खानापूर, चंदगड, गडहिंग्लज, हुक्केरी, चिकोडी तालुक्मयांतून जाणाऱया भाविकांची संख्या मोठी आहे. यासाठी यात्राकाळात जादा बस धावणार आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 पासून रात्री 10 वाजेपर्यंत ही विशेष सेवा उपलब्ध राहणार आहे. एका प्रवाशासाठी 120 रुपये पूर्ण तिकीट तर 60 रुपये हाफ तिकीट असणार आहे. शिवाय बसस्थानकात ksrtc.karnataka.gov.in  या वेबसाईटवर ऑनलाईन तिकीट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

रात्री उशिरापर्यंत ही बससेवा सुरू राहणार

के. के. लमाणी (विभागीय संचार अधिकारी)

प्रवाशांच्या हिताचा विचार करून बेळगाव-सौंदत्ती मार्गावर यात्रेसाठी अतिरिक्त विशेष बस धावणार आहेत. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत ही बससेवा सुरू राहणार आहे. दि. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबरपर्यंत या विशेष बस धावणार आहेत.

Related Stories

शेतकऱयांचे प्रादेशिक आयुक्तांना निवेदन

Amit Kulkarni

केएलएस आयएमईआरमध्ये वेबिनारचे आयोजन

Omkar B

अनगोळ मारुती मंदिर नवीन रथाची मिरवणूक रद्द

Amit Kulkarni

संगोळ्ळी रायण्णा सैनिक शाळा लवकरच सेवेत

Amit Kulkarni

खानापूरची माती म्हणजे शिंपल्यातला मोती

Omkar B

परिवहनचे कर्मचारी ऑक्टोबरच्या वेतनाविना

Patil_p
error: Content is protected !!