Tarun Bharat

एडीजीपी अलोककुमार बेळगावात दाखल

निपाणी, बेळगाव येथे आज बैठक

प्रतिनिधी /बेळगाव

कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महानिरीक्षक (एडीजीपी) अलोककुमार हे सोमवारी रात्री बेळगावला आले आहेत. मंगळवारी निपाणी येथे आंतरराज्य पोलीस अधिकाऱयांच्या बैठकीत ते भाग घेणार असून दुपारी बेळगाव शहरातील अधिकाऱयांची बैठक होणार आहे.

निपाणी येथील सरकारी विश्रामधाम येथे मंगळवारी सकाळी 9.30 वाजता आंतरराज्य पोलीस अधिकाऱयांची बैठक होणार आहे. या बैठकीत कोल्हापूर, सांगलीसह महाराष्ट्रातील वेगवेगळय़ा जिल्हय़ांचे वरि÷ पोलीस अधिकारी भाग घेणार आहेत. मंगळवारी दुपारी 12 वाजता पोलीस मुख्यालयात बेळगाव शहरातील पोलीस अधिकाऱयांची बैठक घेऊन गुन्हेगारी प्रकरणांचा आढावा घेणार आहेत.

अधिकारीही राहणार उपस्थित

उपलब्ध माहितीनुसार डीआयजी दर्जाचे तीन अधिकारी, 8 जिल्हा पोलीसप्रमुख व 13 पोलीस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी बैठकीत भाग घेणार असून बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख महानिंग नंदगावी यांच्यासह जिल्हय़ातील वरि÷ अधिकारी बैठकीत असणार आहेत. 

Related Stories

‘त्या’ शिवप्रेमींना न्यायालयाकडून जामीन

Amit Kulkarni

बेंगळूरचा के.रूबल ‘मि.पंचमुखी’ किताबाचा मानकरी

Amit Kulkarni

शिवप्रति ष्ठानचे कार्यकर्ते सांगलीला रवाना

Patil_p

चंद्रग्रहणाचा बाजारपेठेवर परिणाम

Patil_p

काहेरतर्फे पर्यावरण दिन साजरा

Amit Kulkarni

राज्यात 24 तासात कोरोनाचे चार बळी

Patil_p