वृत्तसंस्था/ रायपूर
उत्तराखंडच्या पिथौरागढमधील आदि कैलास आणि ओम पर्वतावरील यात्रा तात्पुरती पुढे ढकलण्यात आल्याचे कुमाऊं मंडल विकास महामंडळाचे अधिकारी एलएम तिवारी यांनी सांगितले. पावसाळी वातावरणामुळे पर्वतावरील तीर्थयात्रेत व्यत्यय येण्याच्या भीतीने तीर्थयात्रा पुढे ढकलण्यात आली आहे. पावसाळी वातावरण मावळताच भाविकांच्या प्रवासासाठी परवानगी दिली जाणार असून त्याची नोंदणी सप्टेंबरमध्ये पुन्हा सुरू होईल, असे सांगण्यात आले. गेल्या ऑक्टोबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोलिंगकाँगच्या भेटीनंतर आदि कैलास प्रसिद्धीझोतात आले होते. या ठिकाणावरून कैलास पर्वताचे शिखर दिसते. 13 मे रोजी सुरू झालेल्या या यात्रेत सुमारे 600 भाविक यात्रेला गेले होते.