Tarun Bharat

‘गांधी टॉक्स’मध्ये अदिति राव

Advertisements

विजय सेतुपति, अरविंद स्वामी मुख्य भूमिकेत

2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी एका चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे नाव ‘गांधी टॉक्स’ असून निर्मात्यांनी याचा टीझर सादर केला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन किशोर बेलेकर करणार आहेत.

‘गांधी टॉक्स’मध्ये विजय सेतुपति, अरविंद स्वामी आणि अदिति राव यासारखे कलाकार आहेत. तसेच मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव देखील यात दिसून येणार आहे. ‘गांधी टॉक्स’ हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे. हा एक सायलेंट चित्रपट असणार आहे, म्हणजेच यात कुठलाही कलाकार बोलताना दिसून येणार नाही. केवळ इशाऱयांमध्ये आणि हावभावाने अभिनय केला जाणार आहे. 

गांधी टॉक्सच्या चारही व्यक्तिरेखा म्हणजेच विजय सेतुपति, सिद्धार्थ जाधव, अरविंद स्वामी आणि अदिति राव असणार आहेत. त्यांच्यासोबत वेगवेगळी माकडंही दाखविण्यात आली आहेत. यात सिद्धार्थसोबत ‘बुरा मत सुनो’चे माकड आहे. तर अदितिकडे ‘बुरा मत बोलो’चे माकड अन् अरविंद स्वामीकडे ‘बुरा मत देखो’चे माकड दाखविण्यात आले आहे. गांधी टॉक्स हा चित्रपट तमिळ, तेलगू, कन्नड आणि हिंदी, मल्याळी तसेच मराठी भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.

Related Stories

‘इतिहासाच्या योग्य बाजूने उभे राहा’, सोनम कपूरचा देशवासीयांना सल्ला

tarunbharat

चिंचि चेटकिणीच्या भूमिकेतून वैभव मांगलेंची एक्झिट! चर्चेला उधाण,निर्मात्याचे स्पष्टीकरण

Archana Banage

घानी चित्रपटात तमन्ना भाटिया

Patil_p

बावरा दिलमध्ये मराठी अभिनेत्री सुमुखी पेंडसे झळकणार

Patil_p

इतिहासातील अभूतपूर्व लढाई पावनखिंडीचा ट्रेलर प्रदर्शित

Abhijeet Khandekar

‘जलसा’चा ट्रेलर प्रदर्शित

Patil_p
error: Content is protected !!