Tarun Bharat

आदित्य मित्तल 77 वा ग्रँडमास्टर

वृत्तसंस्था/ चेन्नई

भारतीय बुद्धिबळ क्षेत्रामध्ये मुंबईचा बुद्धिबळपटू 16 वर्षीय आदित्य मित्तल हा भारताचा 77 वा ग्रँडमास्टर ठरला आहे. स्पेनमध्ये सध्या सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत आदित्य मित्तल सहभागी झाला आहे.

मुंबईच्या आदित्य मित्तलने विविध आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी करताना यापूर्वी तीन ग्रँडमास्टर नॉर्म मिळवले आहेत. स्पेनमध्ये सुरू असलेल्या बुद्धीबळ स्पर्धेतील सहाव्या फेरीअखेर आदित्य मित्तलने 2500 यलो गुणांचा टप्पा ओलांडला त्याने सहाव्या फेरीतील स्पेनच्या फ्रान्सिस्को पॉन्सला बरोबरीत रोखले या कामगिरीनंतर तो ग्रँडमास्टरचा मानकरी ठरला. आदित्यने 2021 साली झालेल्या सर्बिया मास्टर्स बुद्धीबळ स्पर्धेत पहिला ग्रँडमास्टर नॉर्म तर त्यानंतर 2021 च्या इलोब्रगेट खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत दुसरा ग्रँडमास्टर नॉर्म आणि 2022 च्या सर्बिया मास्टर्स बुद्धीबळ स्पर्धेत त्याने तिसरा ग्रँडमास्टर नॉर्म मिळवला. स्पेनमधील सुरु असलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत आदित्य मित्तल गुणतक्त्यात पाच गुणासह संयुक्त आघाडीवर आहे. 2022 च्या कालावधीत ग्रँडमास्टर किताब मिळवणारा मित्तल हा भारताचा पाच बुद्धीबळपटू आहे. यापूर्वी भरत सुब्रमणियम, राहुल श्रीवास्तव, व्ही. प्रणव आणि प्रणव आनंद यांची ग्रँडमास्टर किताब मिळवला आहे.

Related Stories

मरेला हरवून इटलीचा बेरेटिनी अजिंक्य

Patil_p

युक्रेनच्या स्विटोलिनाचा रशियन खेळाडूवर विजय

Patil_p

क्रेसी, बुबलीक यांच्यात अंतिम लढत

Patil_p

आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर

Patil_p

दर्जेदार कामगिरीची कर्णधार चार्लेटकडून ग्वाही

Patil_p

टोकियो पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविना

Patil_p