Tarun Bharat

गद्दारांची प्रश्न विचारायची लायकी नसते, आदित्य ठाकरेंचा आमदार कांदेंवर घणाघात

ऑनलाईन टीम/तरुण भारत

एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) चांगले ऍक्टिव्ह मोडमध्ये आलेत. पक्षमजबूत करण्यासाठी अधित्य ठाकरे शिवसंवाद यात्रा कढत आहेत. दरम्यान, शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून या शिवसंवाद यात्रेला सुरुवात झाली. यावेळी त्यांनी बंडखोरांवर चान्गलाच हल्लाबोल केला. तसेच शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी मनमाड येथे शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांच्या बंडाळीवर खंत व्यक्त केली आहे. मी आज सकाळी येथे येत असताना अनेक आठवणींना उजाळा देत होतो. नक्की काय घडलं असेल?, याचा मी विचार करत होतो. ही गद्दारी कशामुळे झाली हे कळलंच नाही. दरम्यान गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर घणाघात केला आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेनिमित्त मनमाड दौऱ्यावर असताना असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी आदित्य ठाकरेंना केले आहे. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी कांदे यांच्यावर त्याचे नाव न घेता टीका केली आहे.

हे ही वाचा : एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं ; सुहास कांदेंचा गंभीर आरोप

आदित्य ठाकरे म्हणाले, हे राजकारण मला अजूनही कळलेलं नाहीये. मी येथे येण्याआधी भगवान श्रीरामचं दर्शन घेतलं आहे. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाए पर वचन न जाई हे एक ब्रीदवाक्य शिवसेनेचं झालंय. तसंच काम आपण करत होतो. येथील पाण्याचा प्रश्न देखील आपण सोडवला. गद्दार नसते तर सर्व प्रश्नांची उत्तर दिलं असती. पण गद्दारांना प्रश्न विचारायची हिंमत आणि लायकी नसावी. शिवसैनिकांनी आणि नागरिकांनी जर प्रश्न विचारला असता तर मी उत्तर देण्यासाठी कटीबद्ध आहे. परंतु गद्दारांना मी उत्तर देणार नाही. त्यांनी गद्दारी काय केली हेचं उत्तर त्यांनी मला पहिलं द्यावं, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे राजकारण आपल्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे. ते कुणालाच पटणारं नाहीये. कारण ज्या माणसांनी, कुटुंबप्रमुखांनी आपल्याला एक ओळख निर्माण करून दिली. तसेच आपल्याला जोपासलं आणि सांभाळून घेतलं. तुम्हाला तिकीट दिलं, तुमच्यासाठी प्रचार केला आणि मेहनत घेतली. पण सत्ता आल्यानंतर आपण जे काही राज्यातील जनतेला शब्द दिले होते किंवा जी काही वचनं होती, ती पूर्ण केली असूनही पुढील काम आम्ही करत आहोत. मग अशा मुख्यमंत्र्यांच्या पाठीत यांनी खंजीर का खुपसला?, असा सवाल आदित्य ठाकरेंनी विचारला आहे.

Related Stories

यशवंतराव चव्हाण यांच्या कोल्हापुरातील पुतळ्याचे शुक्रवारी अनावरण

Archana Banage

मनमोहन सिंग यांच्या पत्राला केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिले उत्तर; म्हणाले…

Archana Banage

निर्णय घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींकडे द्या

Patil_p

भारताचा विकासदर येणार 2.8 टक्क्यांवर

prashant_c

नवज्योतसिंग सिद्धूंनी राजीनामा दिल्यानंतर जारी केला व्हिडीओ संदेश; म्हणाले…

Archana Banage

कोरोना लस : अमेरिका-चीनमध्ये तीव्र स्पर्धा

Patil_p