Tarun Bharat

आदित्य ठाकरेंच्या बुलढाण्यातील सभेला परवानगी नाकारली

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या बुलढाण्यातील सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यापूर्वी त्यांच्या जळगावातील सभेलाही परवानगी नाकारण्यात आली होती. त्यामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

सोमवारी (7 नोव्हेंबर) बुलढाण्यातील गांधी भवन परिसरात आदित्य ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली होती. बुलढाणा शहरातील गांधी भवन हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने जाहीर सभांसाठी ते प्राधान्याने निवडले जाते. त्यानुसार ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरेंच्या सभेसाठी परवानगी मागण्यात आली होती. पण शिंदे गटाचे स्थानिक आमदार संजय गायकवाड यांचे कार्यालय याच परिसरात असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते असे कारण पुढे करत पोलीस प्रशासनाने नियोजित सभेला परवानगी नाकारली आहे.

अधिक वाचा : स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम नेगी यांचे निधन

दरम्यान, उद्धव ठाकरेंना वाढते जनसमर्थन मिळत असल्यानेच सत्ताधाऱ्यांनी सभा नाकारण्याचे षडयंत्र सुरू केल्याचे शिवसेना नेत्यांचे म्हणणे आहे. राजकीय दबावाखाली पोलीस सभेला परवानगी नाकारत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

Related Stories

उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना CBI कडून क्लीन चिट

datta jadhav

आनेवाडी टोलनाका 9 सप्टेंबरला बंद पाडणार

Patil_p

काँग्रेसमुक्त भारत शक्य नाही- शरद पवार

Abhijeet Khandekar

महाराष्ट्रात सलून सुरू करण्यास राज्य सरकारची परवानगी

Tousif Mujawar

सातारा : जिल्हा प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याची आवश्यकता – गृहमंत्री अनिल देशमुख

Archana Banage

शाहूनगरात घरफोडी करुन 59 हजारांचा ऐवज लंपास

Patil_p