Tarun Bharat

आल्त दाबोळीतील हवाई मार्गातील एका घराविरूध्द प्रशासनाची कारवाई

प्रतिनिधी /वास्को

वास्कोतील आल्त दाबोळी भागातील हवाई उड्डाणाच्या मार्गात येणाऱया 46 घरांपैकी एका घराविरूध्द बुधवारी जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. पोकलीनच्या सहाय्याने हे घर तोडण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. उर्वरीत 45 घरांना सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरत्या काळासाठी अभय दिले आहे.

दाबोळीतील हवाई उड्डाण मार्गात येणाऱया एकूण 46 घरांचा प्रश्न काही वर्षापासून न्यायप्रविष्ठ आहे. या घरांची उंची हवाई उड्डाण प्राधिकरणाने निर्धारीत केलेल्या नियमांपेक्षा अधिक असल्याने नौदलानेही या घरांना आक्षेप घेतलेला आहे. उच्च न्यायालयाने साधारण दोन वर्षांपूर्वी ही घरे पाडण्याचा आदेश स्थानिक प्रशासनाला दिला होता. मात्र, या 46 घरमालकांपैकी 45 घरमालकांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला तात्पुरती स्थगीती दिलेली असून या घरांचे भवितव्य आता सर्वोच्च न्यायालयाच्या हाती आहे. परंतु 46 पैकी एका घरमालकाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचे टाळले होते. त्यामुळे त्याच्या घराला सर्वोच्च न्यायालयाचा आदेशा लागत नाही. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करीत बुधवारी या एकमेव घराविरूध्द प्रशासनाने कारवाई केली. यावेळी उपजिल्हाधिकारी, मामलेदार, इतर प्रशासकीय अधिकारी, मुरगाव नियोजन व विकास प्राधिकरणाचे अधिकार उपस्थित होते. पोलीस संरक्षणात ही कारवाई करण्यात आली.

आज आपल्या घराविरूध्द कारवाई होईल याची कल्पना या कुटुंबाला नव्हती. त्यामुळे त्यांना या कारवाईचा धक्काच बसला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याची आपली एwपत नव्हती. त्यामुळे आपण आव्हान देण्याचे टाळल्याचे घरमालकाने म्हटले आहे. ही सर्व 46 घरे खासगी जमीनीवर आहेत. एका घरावर कारवाई झाल्याने इतर घरामालक व त्यांच्या कुटुंबांना आपल्या घरांबाबत चिंता वाटू लागलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आमच्याविरूध्द आल्यास काय होईल अशी चिंता या कुटुंबांना सतावू लागलेली आहे.

Related Stories

गोव्याच्या समृद्धीसाठी भाजपाला हॅट्ट्रिकची संधी द्या : जे. पी.नड्डा

Amit Kulkarni

म्हापसा विकास आघाडीचे 20 उमेदवार जाहीर

Patil_p

फोंडा शहर लॉकडाऊनचा तुर्त विचार नाही !

Omkar B

पर्वरीत सिग्नल यंत्रणा ठप्प

Amit Kulkarni

… तर संपूर्ण गोव्यातील पोलिसस्थानके कमी पडतील

Patil_p

पिसुर्ले बेकायदेशीर चिरेखाणीच्या खंदकात महिलेची आत्महत्या

Patil_p