Tarun Bharat

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू

पुणे / प्रतिनिधी :

Admission process for Central Public Service Commission training is on केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या विनामूल्य प्रशिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत भरता येणार असल्याची माहिती राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेचे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी येथे दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था (SIAC), मुंबई, भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती व नागपूर, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी संचलित डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र (एसीईसी), पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका संचलित सावित्रीबाई फुले ऍकॅडमी, पुणेमार्फत केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 साठी पूर्ण वेळ विनामूल्य प्रशिक्षण देण्याकरिता सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून इच्छुक पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज 25 नोव्हेंबरपर्यंत या कालावधीत भरता येतील. अर्ज भरण्याची तसेच परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबरपर्यंत आहे. प्रवेश परीक्षा 4 डिसेंबर 2022 (ऑफलाइन पद्धतीने) घेण्यात येईल. परीक्षेची वेळ सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत राहील. परीक्षेची जाहिरात, अभ्यासक्रम, ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत माहिती व परीक्षेसंबंधी इतर सर्व सूचना www.siac.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था, मुंबईचे संचालक डॉ. के. एस. जैन यांनी केले आहे.

Related Stories

देशात 1.17 लाख नवे बाधित

datta jadhav

अयोध्येतील मशिदीला बाबरचे नाव नसणार

Patil_p

सीआरपीएफ ताफ्यावरील हल्ल्यात दोघांना वीरमरण

Amit Kulkarni

गैरवर्तवणूक भोवली; राज्यसभेच्या 12 खासदारांचे निलंबन

datta jadhav

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा कट उधळला

Patil_p

इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी 3 पोलीस अधिकाऱ्यांची निर्दोष मुक्तता

Tousif Mujawar