गायींच्या देखभालीचा खर्च अधिक : दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनांना आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
गो-शाळेतील जनावरांच्या देखभालीसाठी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून नागरिक, सामाजिक संस्था व खासगी संस्थांनी जनावरांना दत्तक घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पशुसंगोपन मंत्री प्रभू चक्हाण यांनी केले आहे.
गो-शाळेसाठी शासनाचा निधी कमी पडू नये, जनावरांची परवड होऊ नये, यासाठी दत्तक योजना राबविण्यात आली आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटनांनी गो-शाळेतील जनावरांना दत्तक घेऊन त्यांच्या देखभालीचा खर्च उचलावा, असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात गो-शाळा उभारल्या जात आहेत. काही गो-शाळा सुरू झाल्या आहेत. काही गो-शाळांचे काम सुरू आहे. सुरू झालेल्या गो-शाळांमध्ये जनावरांच्या देखभालीसाठी दत्तक योजना राबविली जात आहे.
बेळगाव जिल्हय़ात हुक्केरी तालुक्मयातील बेळवी या ठिकाणी सुसज्ज गो-शाळा उभारली जात आहे. काम पूर्ण होताच भाकड काळातील जनावरांना या ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. त्यानंतर दत्तक योजना राबविली जाणार आहे.
भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गो-शाळा
भाकड जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी गो-शाळा उभारल्या जात आहेत. मात्र, गो-शाळेतील जनावरांसाठी शासनाचा निधी अपुरा पडू शकतो. अशा वेळी आर्थिक साहाय्याची गरज असते. सामाजिक संघटनांनी एखाद्या जनावरांचा वर्षभराचा खर्च पाहावा, यासाठी दत्तक योजना राबविली जात आहे. एखाद्या व्यक्तीने दत्तक योजनेतून जनावराला दत्तक घेतल्यास त्याच्या देखभालीचा खर्च पाहावा लागणार आहे. शिवाय शासनाने गो-शाळेतील संपूर्ण माहिती देण्यासाठी वेब पोर्टल सुरू केले आहे.
एका दिवसाचा देखभाल खर्च 70 रुपये
राज्यात 215 हून अधिक गो-शाळा आहेत. त्यामध्ये नवीन 100 गो-शाळांची भर पडली आहे. यामध्ये विशेषतः देशी आणि इतर गायींचा समावेश आहे. दत्तक योजनेतून गो-शाळेतील जनावरांवर खर्च केला जाणार आहे. शिवाय एका वर्षासाठी एका गायीचा 11 हजार रुपये तर एका दिवसाचा 70 रुपये देखभाल खर्च राहणार आहे.