प्रतिनिधी / बेळगाव
स्टेट कंझ्युमर फोरम गुलबर्गा येथे हलविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र त्याला विरोध करत येथील वकिलांनी मंगळवार दि. 14 जूनला कामावर बहिष्कार घालून तीव्र आंदोलन छेडले. दरम्यान आज बुधवार दि. 15 जून रोजीही हे आंदोलन सुरू आहे.
बेळगावमध्ये स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करण्यासाठी सरकारने मान्यता दिली होती. हा कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मात्र अचानक येथील स्टेट कंझ्युमर आयुक्त फोरम गुलबर्ग्याला हलविण्यात आले आहे. त्यामुळे त्याविरोधात वकिलांनी कामावर बहिष्कार घालून काल मंगळवार दि. 14 जून रोजी तीव्र आंदोलन छेडले होते. तातडीने हा निर्णय सरकारने बदलावा यासाठी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यात आले होते. याचबरोबर लवकरात लवकर बेळगावात कंझ्युमर आयुक्त फोरम स्थापन करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला होता.