Tarun Bharat

अफगाणचा आयर्लंडवर 27 धावांनी विजय

Advertisements

वृत्तसंस्था/ बेलफास्ट

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत सोमवारी झालेल्या चौथ्या सामन्यात नजीबुल झद्रनचे अर्धशतक व सामनावीर रशिद खानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर अफगाणने आयर्लंडचा 27 धावांनी पराभव करत या मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली आहे. या सामन्यात पावसाचा अडथळा आल्याने पंचांनी प्रत्येकी 11 षटकांचा खेळ खेळविण्याचा निर्णय घेतला.

या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून अफगाणला प्रथम फलंदाजी दिली. अफगाणने 11 षटकात 6 बाद 132 धावा जमवल्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव 11 षटकात 105 धावांत आटोपला.

अफगाणच्या डावामध्ये नजीबुल झद्रनने 24 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारासह 50, रशीद खानने 10 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 31, रेहमानुल्ला गुरबाजने 13 चेंडूत 2 षटकार आणि 3 चौकारासह 24 धावा फटकावल्या. झझाईने 6 तर कर्णधार नबीने 5 धावा केल्या. अफगाणच्या डावात 8 षटकार आणि 10 चौकार नोंदविले गेले. आयर्लंडतर्फे डेलॅनीने 33 धावात 3 तर ऍडेर, मॅकार्थी आणि हँड यांनी प्रत्येकी एक बळी मिळविला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात डॉकरेलने 27 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारासह नाबाद 41, स्टर्लिंगने 9 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 20, कर्णधार बलबिर्नीने 5 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारासह 15, टेक्टरने 2 चौकारासह 13 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 4 षटकार आणि 11 चौकार नोंदविले गेले. अफगाणतर्फे ‘सामनावीर’ रशीद खानने 21 धावात 2, फरीद अहमदने 14 धावात 3, नवीन उल हकने 25 धावात 2 तर ओमरझाईने 25 धावात एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक ः अफगाण 11 षटकात 6 बाद 132 (नजिबुल झद्रन 50, रशीद खान नाबाद 31, गुरबाज 24, डेलॅनी 3-33, ऍडेर, मॅकार्थी, हँड प्रत्येकी एक बळी), आयर्लंड 11 षटकात सर्वबाद 105 (डॉकरेल नाबाद 41, स्टर्लिंग 20, बलबिर्नी 15, टेक्टर 13, फरीद अहमद 3-14, रशीद खान 2-21, नवीन उल हक 2-25, ओमरझाई 1-25).

Related Stories

तिरंदाजी स्पर्धेत भारताचे दुसरे पदक निश्चित

Patil_p

ऍडलेडच्या कसोटीला कोरोनाची बाधा

Patil_p

मुष्टीयुद्ध स्पर्धेत सतीशकुमार अंतिम फेरीत

Patil_p

भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाची विजयी सलामी

Patil_p

स्पेन संघात बुस्केटचे पुनरागमन

Patil_p

AUS vs IND : ऑस्ट्रेलियाचा विजय पंच; भारत उपविजेता

tarunbharat
error: Content is protected !!