वृत्तसंस्था/ काबूल
पाकचा क्रिकेट संघ अफगाणमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. सदर मालिका शारजा या त्रयस्थ ठिकाणी 24 ते 27 मार्च दरम्यान होणार आहे. या मालिकेसाठी क्रिकेट अफगाणने 17 जणांचा संघ जाहीर केला असून रशीद खानकडे नेतृत्व सोपविण्यात आले आहे.
या मालिकेसाठी निवडण्यात आलेल्या अफगाण संघामध्ये डावखुरा सलामीचा फलंदाज एस. अटल याचा समावेश करण्यात आला असून वरिष्ठ अष्टपैलू मोहमद नबीचे संघात पुनरागमन झाले आहे. रेहमत शहा आणि एच. झेझाई यांना मात्र वगळण्यात आले आहे.
अफगाण संघ- रशीद खान (कर्णधार), गुरबाज इब्राहिम झेद्रान, उस्मान घनी, एस. अटल, नजीबुल झेद्रान, झेझाई, करीम जेनत, मोहमद नबी, ओमरझाई, नईब, एस. अश्रफ, नूर अहमद, मुजीब उर रेहमान, फरीद अहमद, फरुकी, नवीन उल हक.