वृत्तसंस्था/कोलंबो
अफगाण आणि न्यूझीलंड यांच्यातील एकमेव कसोटी सामना ग्रेटर नोएडा येथे सप्टेंबर महिन्यात आयोजित केला आहे. या दोन संघातील ही पहिलीच कसोटी आहे.
न्यूझीलंडचा संघ ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान भारतात येणार असून या दौऱ्यात उभय संघात तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळविली जाणार आहे. अफगाण आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका जुलैमध्ये खेळविण्याचे ठरविले होते. पण उत्तर भारतामध्ये उन्हाळा कडक असल्याने ही मालिका लांबणीवर टाकण्यात आली होती. 2020 च्या मार्चनंतर पहिल्यांदाच अफगाणचा संघ ग्रेटर नोएडामध्ये सामना खेळणार आहे.