वृत्तसंस्था/ काबूल
आगामी लंका दौऱयासाठी अफगाण क्रिकेट मंडळाने 18 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे. आयसीसीच्या विश्वचषक सुपर लिग स्पर्धा अंतर्गत उभय संघात तीन सामने कॅन्डी येथे खेळविले जाणार आहेत. 25 ते 30 नोव्हेंबर दरम्यान हे सामने होणार आहेत.
अफगाण संघामध्ये अष्टपैलू गुलबदन नईब आणि डावखुरा फिरकी गोलंदाज नूर अहमद यांचे पुनरागमन झाले आहे. 2023 साली भारतात आयसीसीची विश्व करंडक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रतेकरिता सुपर लिग स्पर्धा सध्या घेतली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना 25, दुसरा सामना 27 आणि तिसरा सामना 30 नोव्हेंबरला कॅन्डीच्या पल्लिकेली स्टेडियममध्ये होणार आहे.
अफगाण संघ- हसमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रेहमत शहा (उपकर्णधार), गुरबाज, ए. ओमरझाई, फरीद मलिक, फझल फरुकी, गुलबदन नईब, इब्राहिम झेद्रान, इक्राम अलिखेल, मोहमद नबी, मुजिब उर रेहमान, नजीबुल झेद्रान, नूर अहमद, रशीद खान, रियाज हसन, एस. कमाल, यामीन अहमदेझाई आणि झिया उर रेहमान अकबर.