वृत्तसंस्था/ दुबई
आशिया चषक 2022 च्या टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी बांगलादेश क्रिकेट संघटनेने अफिफ हुसेनची शनिवारी आपल्या संघाच्या उपकर्णधारपदी नियुक्ती केली आहे.
ही स्पर्धा महत्त्वाची असून अष्टपैलू अफिफ हुसेनने बांगलादेशचे 47 टी-20 सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. त्याने 2018 फेब्रुवारी महिन्यात आपले आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदार्पण केले होते. आशिया चषक स्पर्धेसाठी शकीब अल हसन बांगलादेश संघाचा कर्णधार आहे.
याच्या महिन्यात बांगलादेश क्रिकेट मंडळाने शकीब अल हसनची संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली. या स्पर्धेसाठी दुखापतीमुळे त्यांच्या दोन महत्त्वाच्या खेळाडूंना सहभागी होता आले नाही. बांगलादेशच्या लिटॉन दासला दुखापतीमुळे संघातून वगळण्यात आले.
बांगलादेश संघ- शकीब अल हसन (कर्णधार), अनामुल हक, मुश्फिकुर रहीम, अफिफ हुसेन, मुसद्देक हुसेन, मेहमूदुल्ला, शेख मेहदी हसन, मोहम्मद सैफुद्दीन, मुस्तफिजूर रेहमान, नेसूम अहमद, शब्बीर रेहमान, मेहदी हसन मिराज, तस्कीन अहमद, इबादत हुसेन, परवेझ हुसेन आणि मोहम्मद नईम.