Tarun Bharat

अफताबची नाटके सुरुच

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

श्रद्धा वालकर या तरुणीची निर्घृण हत्या करणारा अफताब पूनावाला याला तिहार कारागृहात एका स्वतंत्र कोठडीत ठेवण्यात आले आहे. त्याने अन्य कैद्यांवर हल्ला करु नये आणि त्याला कोणी जखमी करु नये यासाठी ही योजना करण्यात आली आहे. त्याच्यावर आठ कॅमेऱयांमधून चोवीस तास लक्ष ठेवले जात आहे.

त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्लीतील न्यायालयाने दिला होता. त्यानंतर त्याला तिहार कारागृहाच्या चार क्रमांकाच्या विभागात ठेवण्यात आले. त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असून त्याच्या कोठडीबाहेर चोवीस तास एक पोलिस ठेवण्यात येत आहे. त्याला कोठडीतही अधिक हालचाल करता येऊ नये याची दक्षता घेण्यात येत असून कक्षातून बाहेरही पडण्यास त्याच्यावर बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी काही दिवस सुरु राहील, अशी माहिती तिहार कारागृहाच्या अधिकाऱयांनी पत्रकारांना दिली.

अन्न देतानाही दक्षता

अफताब पूनावाला याला जेवण किंवा इतर अन्न देतानाही दक्षता बाळगण्यात येत आहे. पोलिस अधिकाऱयाच्या समक्षच त्याला अन्न देण्यात यावे, असा आदेश कारागृहच्या प्रमुख अधिकाऱयांनी शनिवारी काढला. शनिवारी त्याची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली. पण या चाचणीची तयारी त्याने आधीपासूनच केली असावी असा तपास अधिकाऱयांना संशय आहे. त्यामुळे 28 नोव्हेंबरला त्याची नार्को चाचणी केली जाणार जाईल. या चाचणीच्या आधारावर पुढील तपास केला जाईल.

अफताबची नाटके सुरुच

पॉलिग्राफ चाचणी करत असताना अफताबने मुद्दामहून खोकण्यास प्रारंभ केला. त्यामुळे स्क्रीनवरील ग्राफ बिघडून गेला. या चाचणीसंबंधीची माहिती त्याने आधी कोणाकडूनतरी घेतली असावी. त्यामुळे तो तयार असावा, असा पोलिसांना संशय आहे. ग्राफ बिघडल्याने पूनावाला खरे बोलत आहे किंवा नाही, याची स्पष्ट कल्पना तपास अधिकाऱयांना येऊ शकली नाही, अशी माहिती आहे.

पार्श्वभूमी

पूनावाला याने श्रद्धा वालकर या आपल्या लिव्ह इन पार्टनरचा 18 मे 2021 या दिवशी खून केला. तिच्या मृतदेहाचे तुकडे करुन फ्रीझमध्ये ठेवले आणि नंतर ते तुकडे त्याने विविध ठिकाणी पुरले असे आतापर्यंतच्या तपासातून उघड झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरु आहे.

Related Stories

स्टेट बँकेची ठेवींवरील व्याजदरात कपात

Patil_p

पोप फ्रान्सिस यांनी कॅनडात मागितली माफी

Patil_p

देशात 38,074 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

भारतीय सैन्याच्या उपप्रमुखपदी सैनी यांची निवड

Patil_p

राहुल गांधींनी फडकविला चारमिनारसमोर तिरंगा

Patil_p

दिलासादायक : पंजाबमध्ये एका दिवसात 508 रुग्ण कोरोनामुक्त

Tousif Mujawar