Tarun Bharat

आफताबच्या कोठडीत 14 दिवसांची वाढ

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबच्या कोठडीत न्यायालयाने 14 दिवसांची वाढ केली आहे. त्याला शुक्रवारी दिल्लीतील साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी न्यायालयीन कोठडी वाढवण्याची मागणी करत तपास सुरू असल्याचे सांगितले. गेल्या महिन्यातही आफताबला दिल्लीच्या आंबेडकर हॉस्पिटलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. 10 दिवसांपूर्वी आफताबला घेऊन जाणाऱया व्हॅनवर 4-5 जणांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. फॉरेन्सिक लॅबमध्ये नेत असताना पोलीस व्हॅनवर हल्ला करण्यात आला होता. या धोक्यामुळे तिहार कारागृहाने दिल्ली पोलिसांच्या पथकाला आफताबला विशेष सुरक्षा पुरवण्याचे निर्देश दिले होते.

Related Stories

वर्षाच्या सुरुवातीला लहान मुलांसाठी लस

Patil_p

CRPF जवानाची हत्या करणारा दहशतवादी अटकेत

Archana Banage

अभिनेत्री सोनम कपूरला पुत्ररत्नाचा लाभ

Patil_p

मुलांकडून अनोखी हॉटलाइन

Patil_p

एसआयटीसमोर हजर राहिले सुखबीर सिंह बादल

Patil_p

कंटेन्मेंट झोनमधील विद्यार्थ्यांना दहावी परीक्षा नाही

Tousif Mujawar