Tarun Bharat

आफताबची नार्को चाचणी पूर्ण

श्रद्धाचा मोबाईल-कपडे फेकलेल्या ठिकाणांची दिली माहिती

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पुनावाला याची नार्को चाचणी संपली आहे. पॉलीग्राफ चाचणीनंतर आफताबने नार्को चाचणीतही श्रद्धाची हत्या केल्याची कबुली दिली. तसेच श्रद्धाचा मोबाईल आणि कपडे कुठे फेकले याची माहितीही त्याने दिल्याचे फॉरेन्सिक सायन्स लॅबचे सहाय्यक संचालक संजीव गुप्ता यांनी सांगितले. आता आफताबने दिलेल्या माहितीच्या आधारे तपास अधिकारी पुढील तपास करणार असून श्रद्धाचा मोबाईल आणि अन्य साहित्य शोधण्याचा प्रयत्न करणार आहेत.

दिल्ली पोलिसांनी आफताबला सकाळी 8.40 वाजता रोहिणी येथील बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात नेले होते. येथे चाचणीपूर्वी सामान्य वैद्यकीय तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीत तो तंदुरुस्त असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सकाळी 10 वाजता त्याची नार्को चाचणी चाचणी सुरू झाली. सुमारे दोन तासांनंतर ही चाचणी पूर्ण झाली. या चाचणीवेळी तपास अधिकाऱयांनी प्रश्नावलीनुसार विविध प्रश्नांची विचारणा करत त्याच्याकडून माहिती वदवून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अधिकाऱयांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरे आफताबने इंग्रजीत दिली. नार्को चाचणीवेळी तपास अधिकारी, मानसशास्त्रज्ञांसह, फॉरेन्सिक लॅबमधील तज्ञ आणि आंबेडकर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर उपस्थित होते. नार्को चाचणीत चौकशीदरम्यान आफताब अत्यंत आत्मविश्वासाने उत्तरे देत असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. आतापर्यंतच्या तपासात पहिल्यांदाच तो अगदी विचारपूर्वकपणे उत्तरे देत असल्याचे दिसून आले.

Related Stories

शरद यादवांचा पक्ष राजदमध्ये विलीन

Omkar B

आसाम विधानसभा निवडणुकीत 264 कोटय़धीश उमेदवार

Patil_p

कॅप्टनच्या हॉकीने नाही खेळणार 6 उमेदवार

Patil_p

पुदुचेरीत राष्ट्रपती राजवट लागू होणार!

datta jadhav

चीनच्या कोंडीसाठी व्यापक रणनीती

Patil_p

जम्मूच्या शेतकऱयांसाठी बीएसएफचा पुढाकार

Patil_p